येत्या २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता अखेर जुलै महिन्यात या स्पर्धेचे आयोजन जपान येथील टोकियो येथे केले जाईल. या ऑलम्पिकला काहीच दिवस राहिले असतांना भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताची युवा महिला गोल्फपटू आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. यासह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती पहिला भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे.
बंगलोरची २३ वर्षीय आदिती अशोक गेल्या काही वर्षांपासून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा शर्यतीत होती. जुलै २०१८ पासून जेव्हा पात्रता निकष सुरू झाले, तेव्हापासून तिचे नाव चर्चेत होते. ती तीन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या ऑलिम्पिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर होती. तर आंतरराष्ट्रीय गोल्फ परिषदेने २९ जून २०२१ रोजी जाहीर केलेल्या क्रमवारीत ती ४५ व्या स्थानी होती. यासह तिने दुसर्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.
Many congratulations to @aditigolf for becoming the 1st female Indian golfer to qualify for #Tokyo2020 after the final Olympic rankings were released today.
She qualified in 45th place and is going to be playing her 2nd Olympics.#Cheer4India pic.twitter.com/lkpiaUPZ4p
— SAI Media (@Media_SAI) June 29, 2021
याबाबत बोलतांना आदिती म्हणाली, “दोन वेळची ऑलिम्पिक खेळाडू हे एक वेळच्या ऑलिम्पियनपेक्षा नक्कीच ऐकायला छान वाटते. भारताचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणे हा एक मोठा सन्मान आहे. अनेक खेळाडूंना आपल्या कारकिर्दीत खूप कमी वेळा ही संधी मिळते. त्यामुळे मी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या प्रक्रियेबाबत आदिती म्हणाली, “२०१६ सालच्या रियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते. मात्र यावेळी तशी परिस्थिती नव्हती. मी पात्र ठरेल याची मला खात्री होती. आत्तापर्यंत यासाठी केलेल्या प्रवासाचा मला त्यामुळे सार्थ अभिमान आहे.” रियो ऑलम्पिकमध्ये तिने ४१ वा क्रमांक पटकावला होता. मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये या कामगिरीत सुधारणा करण्याची तिला संधी असेल.
महत्वाच्या बातम्या:
रोड टू टोकियो! भारताच्या या दोन जलतरणपटूंनी मिळवली ऑलिंपिकची पात्रता