भारतीय क्रिकेट संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, भारताने पहिल्या दोन सामन्यात विजयाचा आनंद लुटता आला. त्यामुळे भारताने ही मालिका 2-1ने नावावर केली. यापूर्वी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत ट्रॉफी जिंकली होती. सध्या भारतीय संघाचे सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असून शानदार प्रदर्शन करत आहेत. मात्र, अक्षर पटेल हा आशिया चषकात दुखापतग्रस्त झाला होता. आता यावर भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
जसप्रीत बुमराहचे दमदार पुनरागमन
भारतीय स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दीर्घ काळानंतर मैदानात परतले आहेत. तसेच, त्यांना पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी सरावाची संधी मिळत असल्यामुळे भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खूपच समाधानी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घ काळ राहिलेल्या बुमराहने मोहाली आणि राजकोट मैदानात 10-10 षटके गोलंदाजी केली. तो आपल्या गोलंदाजीने प्रभावित करण्यात यशस्वी राहिला. मात्र, तिसऱ्या वनडेत तो खूपच महागडा ठरला. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 81 धावा खर्च केल्या. त्याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते. यानंतर तो आशिया चषक 2023 स्पर्धेतही भारताकडून खेळला होता.
द्रविड काय म्हणाला?
दुखापतीतून पुनरागमन करणारे केएल राहुल आणि श्रेयस अय्यर शानदार लयीत दिसत आहेत. राहुलने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध शतक केले होते. तसेच, अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक ठोकले होते. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक करण्यासोबतच यष्टीरक्षणही केले. तिसऱ्या सामन्यानंतर द्रविड म्हणाला, “सर्वांसाठी सामना खेळणे महत्त्वाचे होते आणि हे चांगले आहे की, त्यांना खेळण्याची संधी मिळाली. जसप्रीतने दोन सामन्यात पूर्ण 10 षटके गोलंदाजी केली. सिराजनेही पुनरागमन करत चांगली गोलंदाजी केली. अश्विनला अशाप्रकारे गोलंदाजी करून चांगले पाहिले. केएल राहुलने पूर्ण 50 षटके यष्टीरक्षण केले आणि चांगली फलंदाजीही केली. आम्हाला सातत्याने सुधारणा करत विश्वचषकात ही लय कायम ठेवायची आहे.”
अजूनही झाला नाही संघात बदल
विश्वचषक संघात आर अश्विन (R Ashwin) याला सामील करण्याच्या प्रश्नावर प्रशिक्षक राहुल द्रविड याने कोणतेही उत्तर दिले नाही. संघात कोणताही बदल करण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तो म्हणाला की, “आपल्याला अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल. एनसीए निवडकर्ते आणि अजित आगरकरच्या संपर्कात आहेत, त्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. जर कोणताही बदल झाला, तर तुम्हाला याची अधिकृत माहिती मिळेल. अजून तरी कोणताही बदल नाहीये.”
विश्वचषकात भारताचा पहिला सामना
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील अभियानाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या एम. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. यानंतर भारत आपला दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तसेच, 14 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. (indian head coach rahul dravid on axar patel injury icc odi world cup 2023)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा