---Advertisement---

‘शिष्य आणि गुरुला एकत्र…’, रवी शास्त्रींनाही पडली पडीक्कल-कोहलीच्या कामगिरीची भुरळ, केलं कौतुक

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 3:45 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपली विजयी मोहीम चौथ्या सामन्यात देखील सुरू ठेवली. आयपीएल २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्यात झालेल्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात एकहाती विजय मिळवला. यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहली आणि पडीक्कल यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना कर्णधार कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज पडीक्कलने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहून गुरुजींचा (शास्त्री) आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी कर्णधार कोहली आणि पडीक्कल यांना टॅग केले आहे.

त्यांनी लिहिले आहे की, ‘शिष्य आणि गुरूला एकत्र लढा देताना पाहायला मजा आली. त्यांनी कठीण कामगिरीही पाहायला अगदी साधी सोपी बनवली.’

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1385289204356296706?s=20

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात विजय तर मिळवलाच. यासोबतच अनेक मोठमोठे विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. देवदत्त पडीक्कलने देखील शतक झळकावताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

त्याने हे शतक पूर्ण करण्यासाठी २० वर्ष २८९ दिवसांचा अवधी घेतला. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या रिषभ पंतने २० वर्ष २१८ दिवसांचा अवधी घेत हा विक्रम केला होता. तसेच मनीष पांडे हा या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. मनीष पांडे ने वय १९ वर्ष २५३ दिवस असताना हा कारनामा केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---