भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. दोन्ही संघांमधील सामना निर्धारित वेळेपर्यंत 1-1 ने बरोबरीत राहिला होता. त्यानंतर भारतानं पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. आता भारतीय संघ मंगळवारी (5 ऑगस्ट) उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना अर्जेंटिना किंवा जर्मनीशी होईल.
भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील सामन्यात प्रचंड चढ-उतार आले. दोन्ही संघातील खेळाडूंशिवाय चाहत्यांची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. वास्तविक, सामन्याच्या 16व्या मिनिटाला भारतीय खेळाडू अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यामुळे मैदान सोडावं लागलं. यानंतर भारतीय संघ पुढील 44 मिनिटं केवळ 10 खेळाडूंसह खेळत राहिला.
अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते या निर्णयाला चुकीचं म्हणत आहेत. मात्र, भारतीय खेळाडूंनी एक खेळाडू कमी झाल्यानंतरही हार न मानता ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंशिवाय समालोचकांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयानंतर भारतीय चाहत्यांनी आनंदानं उड्या मारल्या. चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. तर या सामन्याचं समालोचन करणाऱ्या सुनील तनेजा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले. त्यांना आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. समालोचन करता करता ते ढसाढसा रडायला लागले.
त्याचवेळी भारताच्या विजयानंतर सुमित कुमारनं सौरव गांगुलीच्या प्रसिद्ध सेलिब्रेशनची पुनरावृत्ती केली. त्यानं आपला टी-शर्ट काढून हवेत फिरवला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं 2002 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर आपला टी-शर्ट काढून सेलिब्रेशन केलं होतं. आता सुमित कुमारचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत सेमीफाइनल में प्रवेश कर लिया है। ये भावुकता दर्शाती है देश के प्रति लगाव को🇮🇳😊 pic.twitter.com/Gdx6QphS87
— Naseema Fatima (@imNseemaf) August 4, 2024
हेही वाचा –
“हा माझा शेवटचा सामना…”, उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर श्रीजेशचं भावूक वक्तव्य
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम