---Advertisement---

इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय

On: रविवार, ऑगस्ट 4, 2024 3:44 PM
---Advertisement---

भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्रिटनचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला, ज्यामध्ये भारतानं ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला.

या सामन्यात भारत 10 खेळाडूंसह खेळत होता. अमित रोहिदासला दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाल्यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, भारतीय संघानं हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशा प्रकारे भारतीय संघानं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.

पेनल्टी शूटआऊटमध्ये काय घडलं?
ब्रिटननं पहिला शूटआउट घेतला, ज्यात अल्बरी ​​जेम्सीनं गोल केला.
भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानंही गोल केला.
इंग्लंडसाठी वॉलेस दुसरा शॉट घेण्यासाठी आला आणि त्यानं गोल केला.
भारतासाठी सुखजीत आला आणि त्यानं गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या प्रयत्नात इंग्लंडसाठी क्रोनन आला, जो गोल मारण्याक चुकला.
ललितनं भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल करत 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या प्रयत्नातही इंग्लंडला गोल करता आला नाही. गोलकीपर श्रीजेशनं ब्रिटीश खेळाडूसमोर उभं राहून बचाव केला.
भारतासाठी राजकुमारनं चौथ्या प्रयत्नात गोल केला. अशाप्रकारे भारतानं पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

हेही वाचा – 

खेलिफआधी ‘या’ भारतीय महिला ॲथलिट्सवरही लागलाय पुरुष असण्याचा आरोप
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
पृथ्वी शॉ बॅटनं आग ओकतोय, पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा; गौतम गंभीरच्या संघात संधी मिळेल का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---