---Advertisement---

ऑलिंपिकमध्ये नेदरलँडला पराभूत करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 5:12 PM
---Advertisement---

पुढील वर्षी (२०२१) टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिंक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना विश्वविजेत्या नेदरलँड महिला हॉकी संघासोबत होणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाने नेदरलँड संघाचा सामना केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीविषयी भारतीय संघातील खेळाडूंना जास्त माहिती नाही. याविषयी भारतीय महिला हॉकी संघाची उपकर्णधार सविताने वक्तव्य केले आहे.

ती म्हणाली की, “आम्ही गेल्या काही वर्षात नेदरलँड संघाविरुद्ध खेळलो नाहीत. पण त्यांची खेळण्याची पद्धत, रणनिती या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांचे एफआयएच हॉकी प्रो लीग सामने पाहणार आहोत. तसेच आमचे मुख्य प्रशिक्षक सोजर्ड मारिणे आणि विश्लेषक प्रशिक्षक जन्नेके स्कॉपमन हे नेदरलँडचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला बरीच मदत मिळणार आहे. नेदरलँड हा आक्रमक आणि कुशल संघ आहे, त्यामुळे ऑलिंपिकचा आमचा पहिलाच सामना खूप आव्हानात्मक असेल.”

२७ ते २९ ऑक्टोबर २०२०मध्ये ऍम्सटरडॅम येथे नेदरलँड महिला हॉकी संघ विरुद्ध ग्रेट ब्रिटन महिला हॉकी संघात एफआयएच हॉकी प्रो लीगचा सामना होणार आहे. याविषयी बोलताना सविता म्हणाली की, “हे दोन्ही संघ खूप मजबूत आहेत. म्हणून त्यांच्यातील रोमांचक सामना पाहायला खूप मजा येणार आहे. तसेच कोविड-१९ महामारीमुळे मिळालेल्या ब्रेकनंतर खेळाडूंचे प्रदर्शन कसे असेल, हेदेखील पाहावे लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘…तर ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला खूप मदत मिळेल’

ऑलिंपिक तयारीसाठी हॉकी इंडियाने कसली कंबर, क्रिडाविषयक…

नुकताच कोरोनातून बरा झालेला खेळाडू म्हणतोय, “आता लागतो ‘या’ गोष्टीच्या तयारीला”

आनंदाची बातमी! हरियाणातील छोट्या गावात बनणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान, ‘हा’ खेळाडू झाला खूश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---