ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यानंतर भारताचा दुसरा सर्वात यशस्वी भालाफेकपटू असलेला शिवपाल सिंग याची कारकीर्द संकटात सापडली आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी तो दोषी सापडला असून, त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संघटना (नाडा) यांनी ही कारवाई केली आहे.
मागील वर्षी २६ सप्टेंबरला शिवपालची उद्योजक द्रव्य चाचणी करण्यात आली होती. स्टेरॉइड मेथेंडिएनोन चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत शिवपाल 27 व्या स्थानावर राहिला. ऑक्टोबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याचे निलंबन राहील.
शिवपालने आपल्या खेळाने अनेकदा संपूर्ण देशाची मान उंचावली होती. नीरजसोबत तो तरुण खेळाडूंचा आयडॉल ठरलेला. भारतीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकदा मन की बातमध्ये त्यांचे कौतुक केले होते. मात्र, त्याच्यावर आता कारवाई झाल्याने अनेकांची वेगळी प्रतिक्रिया येत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…