भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने जपानमधील काकामिगाहारा येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2023 मध्ये त्यांच्या मोहिमेची रोमांचक सुरुवात केली. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकले. तिसऱ्या सामन्यात त्यांनी कोरियाविरुद्ध 2-2 असा बरोबरी साधली. तर, भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानवर 22-0 असा शानदार विजय मिळवला. यानंतर मलेशियावर 2-1 असा विजय मिळवत, कोरियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली.
आता गुरुवारी (8 जून) भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघ (Indian Junior Women’s Hockey Team Captain Preeti) उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी चायनीज तैपेईशी भिडणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत सध्या तीन सामन्यांतून सात गुणांसह पूल ए टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. चायनीज तैपेईविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या गट-स्टेज सामन्यात विजय मिळाला तर त्यांना स्पर्धेच्या शेवटच्या चारमध्ये पोहोचवेल. (Hockey Latest News)
महिला हॉकी संघाची कर्णधार प्रीतीने मत व्यक्त केले
सामन्यापूर्वी, भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची कर्णधार प्रीती म्हणाली, “आम्ही आतापर्यंत एकही सामना गमावलेला नसल्यामुळे ही स्पर्धा आमच्यासाठी चांगली ठरली आहे. मलेशिया आणि कोरियाविरुद्ध चुरशीची लढत पहायला मिळाली, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये सुरुवातीचे गोल स्वीकारून आम्ही पुनरागमन केल्यामुळे आम्हाला आमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली.”
पुढे ती म्हणाली की, “आम्ही सतत आमच्या योजना आणि उद्दिष्टे लक्षात ठेवतो, हे सुनिश्चित करून की आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खंबीरपणे उभे राहू. आमच्यासमोर कोणतीही आव्हाने असली तरी आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा आणि आमच्या रणनीतींसाठी वचनबद्ध राहण्याचा निर्धार केला आहे.”
संघाच्या अलीकडच्या फॉर्मचा विचार करता, भारताला चायनीज तैपेईला पराभूत करण्यात फारशी अडचण येणार नाही. चायनीज तैपेई संघाने (Chinese Taipei Team) आतापर्यंत स्पर्धेत खेळलेल्या तीनपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि फक्त तीन गुणांसह पूल अ मध्ये चौथ्या स्थानावर आहे. भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघ (Indian Junior Women’s Hockey Team) 8 जून रोजी त्यांच्या चौथ्या आणि शेवटच्या पूल ए सामन्यात चायनीज तैपेईशी भिडणार आहे. हा सामना दुपारी 12.30 वाजता सुरू होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट