बर्मिघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने इतिहास रचला. कोणाला फारसा माहीत नसलेल्या लॉन बॉल खेळात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करत त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेतील भारताचे हे सुवर्णपदक आहे. या आधी तिन्ही सुवर्णपदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत.
Dear world,
Meet ???????? #TeamIndia's first-ever Commonwealth Games gold medallists in Lawn Bowls ????????
Rupa Rani Tirkey, Nayanmoni Saikia, Lovely Choubey, and Pinki Singh ????????#EkIndiaTeamIndia | #B2022 pic.twitter.com/TckVWCfUkO
— Team India (@WeAreTeamIndia) August 2, 2022
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा अंतिम सामना चांगलाच चुरशीचा झाला. भारताची सुरुवात चांगली झाली होती, पण तीन फेऱ्यांनंतर सामना ३-३ असा बरोबरीत होता. यानंतर भारताने जोरदार खेळ दाखवत सातव्या फेरीनंतर ८-२ अशी आघाडी घेतली. मात्र, ही आघाडी भारताकडे फार काळ टिकली नाही. या फेरीनंतर दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि बाराव्या फेरीनंतर सामना पुन्हा एकदा १०-१० असा बरोबरीत आला. मात्र, त्यानंतर भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवत सामना १७-१० असा आपल्या नावे केला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळामध्ये पदक मिळेल याची अपेक्षा कोणालाही नव्हती. मात्र, भारतीय महिलांनी ही अशक्यप्राय गोष्ट करून दाखवली. भारतीय संघाबद्दल सांगायचे झाल्यास ४२ वर्षीय लवली कॉन्स्टेबल, ४१ वर्षीय पिंकी पीटी टीचर, ३४ वर्षीय रूपा राणी या जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ३३ वर्षीय नयनमोनी सैकिया या वन अधिकारी आहेत. या सर्व खेळाडूंनी रांचीमध्ये सराव केला होता. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने या खेळाडूंची दोन वेळा भेट घेत त्यांचा उत्साह वाढवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या खेळाडूने उलघडले लाजिरवाणे गुपित, सत्य बाहेर आल्याने सर्वत्र खळबळ
बाबो! झिम्बाब्वेचा पठ्ठ्या युवराजचा रेकॉर्ड मोडता-मोडता राहिला, एका षटकात कुटल्या ‘एवढ्या’ धावा






