क्रिकेटमध्ये अनेकदा अनपेक्षित गोष्टी समोर येत असतात. बऱ्याच वेळा खेळाडू आपापल्या संघाबद्दल नवनवीन गौप्यस्फोट करत असतात. ज्याच्यामुळे अनेकदा खेळाडूंना किंबहुना संघाला टीकेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघाचा माजी खेळाडू हीथ डेव्हिस याने स्वत:बद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्याच्यामुळे तो निवृत्तीच्या २० वर्षानंतर चर्चेचा विषय ठरत आहे.
माजी कसोटी वेगवान गोलंदाज हीथ डेव्हिस हा न्यूझीलंडचा समलिंगी म्हणून समोर येणारा पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. व्यावसायिक पुरुष क्रिकेट विश्वात असे प्रकरण क्वचितच पाहायला मिळते. महिला क्रिकेट विश्वात यापूर्वीही अनेक समलिंगी खेळाडू दिसले आहेत. अनेक महिला क्रिकेटपटूंनी लग्नही केले आहे. नताली सीव्हर आणि कॅथरीन ब्रंट, एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, लॉरेन-विनफिल्ड आणि कोर्टनी हिल, लिझेल ली आणि तंजा क्रोनिए या अनेक महिला समलैंगिक आहेत, परंतु व्यावसायिक पुरुष क्रिकेटमध्ये त्या क्वचितच दिसतात.
५० वर्षीय हीदर डेव्हिस सध्या ऑस्ट्रेलियात राहत आहे. डेव्हिसने १९९४ ते १९९७ पर्यंत पाच कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळले. एक वेगवान गोलंदाज म्हणूनही त्याने दीर्घ देशांतर्गत कारकिर्दीचा आनंद लुटला. त्यांची कारकीर्द आश्चर्यकारक कथांनी भरलेली होती. देशातील कसोटी क्रिकेटपटूंमध्ये तो पहिल्यांदाच गे म्हणून समोर आला. ‘द स्पिनऑफ’ या ऑनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डेव्हिस म्हणाले, “मला वाटले की माझ्या आयुष्याचा हा भाग मी लपवत आहे.”
आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील बहुतेक वेळा वेलिंग्टनकडून खेळल्यानंतर, डेव्हिसला अखेरीस जाणवले की त्याला त्याच्या खऱ्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी वातावरणात बदल आवश्यक आहे. तो म्हणाला, “त्यामध्ये बरेच काही होते, फक्त त्याचे वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवणे. तो एकटाच होता, मी त्याला दाबत होतो, मी समलिंगी जीवन जगत नव्हते.” डेव्हिस म्हणाले की, १९९७ मध्ये ऑकलंडमध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा तो त्याच्या मूळ वेलिंग्टनमधून बाहेर पडला तेव्हा त्याचे जीवन सुधारले.
इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक स्टीव्हन डेव्हिस २०११ च्या सुरुवातीला समलिंगी म्हणून सार्वजनिकपणे समोर येणारा पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला होता. त्यानंतर आता निवृत्ती घेतल्यानंतर तब्बल २० वर्षानंतर न्यूझीलंडच्या हीथ डेव्हिस याने जाहिर कलेल्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक






