दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भुवनेश्वर कुमार याचाही भारतीय संघात समावेश व्हायला हवा होता, असं भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे मत आहे. आशिष नेहराच्या मते, भुवनेश्वर कुमारचीही भारतीय संघात निवड झाली असती तर खूप चांगले झाले असते.
अचूक टप्पा आणि स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. या 33 वर्षीय उजव्या हाताच्या गोलंदाजाने नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघातून बाहेर आहे. आशिया चषक 2023 आणि विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीही त्याची संघात निवड झाली नव्हती. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर या गोलंदाजांच्या आगमनामुळे भुवीचे भारतीय संघात पुनरागमन होणे अवघड दिसत आहे.
आशिष नेहरा (Ashish Nehra) याच्या मते, भुवनेश्वर कुमारची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड व्हायला हवी होती. जिओ सिनेमावर बोलताना तो म्हणाला, “दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी तीन वेगवेगळ्या संघांची निवड केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. जवळपास प्रत्येक खेळाडूची निवड झाली आहे. क्वचितच असा कोणी खेळाडू असेल की ज्याचे नाव संघात नाही किंवा ज्याची निवड झाली नाही. माझ्या मनात फक्त एकच नाव येत आहे, कारण संघ दक्षिण आफ्रिकेत जात आहे आणि संघात अनेक गोलंदाज निवडले आहेत, तर भुवनेश्वर कुमारचीही निवड होऊ शकली असती. मी समजू शकतो की तुमच्याकडे नवीन चेंडू टाकणारे अनेक गोलंदाज आहेत पण भुवीची निवड भारतीय संघात व्हायला हवी होती.” (Indian legend upset over Bhuvneshwar Kumar not getting a place in Africa tour Said Rarely like this)
महत्वाच्या बातम्या
द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गांगुलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना…’
IND vs AUS T20: मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठे पार पडणार? वाचा सर्वकाही