भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये झालेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये ८.३१ मीटर उडी मारून सुवर्णपदक आपल्या नावे केले. स्वीडनच्या टोबियास मॉन्टलरने ८.२७ मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. तर फ्रान्सच्या ज्युल्स पोमेरीने कांस्यपदक मिळवले. फक्त अव्वल तीन खेळाडू आठ मीटरच्या पुढे जाऊ शकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या श्रीशंकरच्या नावावर ८.३६ मीटर उडीसा राष्ट्रीय विक्रम आहे.
Sreeshankar consistently jumping far. 🥇in 12th International Jumps Meeting , Kallithea, Greece, event part of World Athletics Continental Tour Bronze. Performance 8.31 meters, Legal wind🌬 @Adille1 @Media_SAI @WorldAthletics @KritikaBhasin13 pic.twitter.com/oY1Xj93gSc
— Athletics Federation of India (@afiindia) May 25, 2022
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, ‘ग्रीसमधील कालिथिया येथे १२ व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये श्रीशंकरने ८.३१ मीटर उडी मारली.’ ऑलिम्पिकनंतर पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या श्रीशंकरने पात्रता फेरीत ७.८८ आणि ७.७१ मीटर उडी मारली. केरळच्या या खेळाडूने हंगामातील पहिल्या इंडिया ओपन जंप मीटमध्ये ८.१४ आणि ८.१७ मीटर उडी मारली होती. कोझिकोड येथील फेडरेशन कपमध्ये त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
तेवीस वर्षीय मुरली श्रीशंकर टोकियो ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करू शकला नव्हता. तो ७.६९ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह संयुक्तपणे 24 व्या क्रमांकावर राहिलेला. त्यामुळे अंतिम फेरीसाठीही तो पात्र ठरू शकला नव्हता. ग्रीसच्या मिल्टिआडिस टँटोग्लूने टोकियो २०२० मध्ये ८.४१ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकलेले. मुरली मागील काही महिन्यांपासून युरोप मध्ये स्पर्धा खेळत आहे तसेच सराव करत आहे. आपले अंतिम ध्येय देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकले असल्याचे, मुरलीने म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
इंतजार खत्म! तब्बल सात वर्षांनंतर आरसीबीच्या वाट्याला आला तो क्षण
Eliminator | पराभवानंतर गौतमचे केएल राहुलसोबत ‘गंभीर मंथन’, अँग्री लूकचा फोटो तुफान व्हायरल