श्रीलंका टी10 लीगमधील गॅले मार्व्हल्स संघाचा मालक ‘प्रेम ठाकूर’ला (Prem Thakur) मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. टूर्नामेंट सुरू झाल्यानंतर एका दिवसानंतर गुरूवारी (12 डिसेंबर) ठाकूरला अटक करण्यात आली. शुक्रवारी (13 डिसेंबर) त्याला कोलंबो दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्रीलंका पोलिसांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “भारतीय नागरिक असलेल्या प्रेम ठाकूरला 2019च्या सामन्याशी संबंधित गुन्हे प्रतिबंधक अंतर्गत लंका स्पोर्ट्स पोलिस युनिटने अटक केली होती. त्याला कँडी येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली, जिथे श्रीलंका टी10 स्पर्धा सुरू आहे.”
माहितीनुसार, प्रेम ठाकूरने दिलेल्या फिक्सिंग ऑफरची माहिती एका परदेशी खेळाडूने दिली होती. या वर्षाच्या सुरुवातीला एलपीएल (लंका प्रीमियर लीग) प्रमाणे, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचा प्रतिनिधी देखील श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) च्या विनंतीनुसार स्पर्धेचे निरीक्षण करण्यासाठी उपस्थित होता.
मात्र, एसएलसीने याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. लंका टी10 स्पर्धेचे संचालक समंथा दोडनवेला यांनी पुष्टी केली आहे की स्पर्धा “नियोजित वेळेनुसार सुरू राहील.”
महत्त्वाच्या बातम्या-
“जसप्रीत बुमराहमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांचे मिश्रण…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; गाबा कसोटीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकाॅर्ड
शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गतच होणार, भारताचे सामने या देशात खेळले जातील