भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो परदेशातील एका संघाकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. आधी पृथ्वी जुलै महिन्यात दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळेल. त्यानंतर तो इंग्लिश काऊंटी संघ नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या 23 वर्षीय पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा भारतीय संघात जागा मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याला जवळच्या व्यक्तींनी आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी ब्रिटनमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून तो सातत्याने सामने खेळून फॉर्ममध्ये येऊ शकेल.
पृथ्वीच्या जवळच्या व्यक्तीने गोपनीयतेच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, “होय, पृथ्वी वेस्ट झोन संघाकडून दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेत खेळल्यानंतर रवाना होईल. सर्वकाही व्यवस्थित झाले, तर तो 19 ते 22 जुलैदरम्यान समरसेट संघाविरुद्ध खेळण्याची आशा आहे.”
पृथ्वी ब्रिटनला गेला, तर तो 24 जुलैपासून सुरू होणाऱ्या देवधर ट्रॉफी आंतरक्षेत्रीय वनडे स्पर्धेत खेळू शकणार नाही. मात्र, आशा आहे की, बीसीसीआय अधिकारी त्याला ब्रिटनमध्ये खेळण्याची परवानगी देतील. तिथे त्याला भारताच्या तुलनेत चांगल्या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करण्यास मिळेल. जर एक खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळत नसेल आणि त्याला काऊंटी क्रिकेटकडून करार मिळाला, तर बीसीसीआय सामान्यता त्याला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देते.
मुंबई उच्च न्यायालयात गेलेलं शॉचं प्रकरण
जवळपास चार महिन्यांपूर्वी पृथ्वी शॉ याचा सपना गिल नावाच्या मुलीशी वाद झाला होता. खरं तर, 15 फेब्रुवारी रोजी पृथ्वी त्याच्या मित्रांसोबत सांताक्रूज येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. यादरम्यान सपना गिल आणि तिच्या एका मित्राने पृथ्वीकडे सेल्फी मागितला.
मात्र, पृथ्वीने त्याने तो मित्रांसोबत जेवायला आल्याचे सांगून सेल्फी काढण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. यानंतर पृथ्वीच्या मित्राने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सपनाला अटक केली होती. मात्र, तिला जामीनावर सोडून दिले. असे असले, तरीही मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉ याची निर्दोष मुक्तता केली.
पृथ्वीची कारकीर्द
पृथ्वी शॉ याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. पाच कसोटी सामन्यात त्याने 42.38च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतकाचाही पाऊस पाडला आहे. याव्यतिरिक्त त्याने वनडेत 189 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, त्याला टी20त एक धावही करता आली नव्हती. त्याने भारतीय संघाकडून अखेरचा कसोटी सामना डिसेंबर 2020मध्ये खेळला होता. तसेच, जुलै 2021मध्ये तो अखेरचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसला होता.
याव्यतिरिक्त आयपीएल 2023 (IPL 2023) संघातही तो काही खास कामगिरी करू शकला नव्हता. त्याने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून 8 सामन्यात फलंदाजी करताना 13.25च्या सरासरीने 106 धावा केल्या होत्या. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश होता. (indian opener batsman prithvi shaw to play for english county team northamptonshire)
महत्वाच्या बातम्या-
निवृत्तीविषयी डिविलियर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘त्यावेळी माझ्यासाठी कुणीच नव्हते…’
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फ्रॉड! आपल्याच खेळाडूंचे 25-25 लाख लाटले, वाचा सविस्तर