भारताने बुधावारी (23 जानेवारी) झालेल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेट्सने पराभूत केले होते. यामध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद 75 धावा केल्या होत्या.
कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळणार नसल्याने युवा खेळाडू शुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
याआधीच पृथ्वी शॉ या युवा खेळाडूलाही भारतीय संघाकडून कसोटीमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे युवा खेळाडूंच्या भारतीय संघातील समावेशाने संघात चांगली प्रतिस्पर्धा वाढली आहे, असे मत शिखरने मांडले आहे.
“शॉने विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत एक शतक आणि 70 धावा केल्या आहेत. यावरूनच दिसून येते की राखीव खेळाडू किती चांगली कामगिरी करत आहेत”, असे शिखर म्हणाला.
“सध्या खेळत असलेल्या 15 खेळांडूमध्येही प्रतिस्पर्धा सुरू आहे”, असेही शिखर म्हणाला.
यावेळी शिखरने त्याला न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव असून येथील खेळपट्टीचा कशी आहे हे मला चांगलेच माहित आहे असेही सांगितले
न्यूझीलंड विरुद्ध खेळताना शिखरने वन-डेमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठला आहे. यावेळी त्याने कर्णधार विराट कोहली बरोबर भागीदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका निभावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–असे नक्की झाले तरी काय की कोहली आणि पीटरसनने केले एकमेकांना ट्रोल
–भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत या विक्रमांकडे असेल लक्ष
–गतविजेत्या विदर्भाची यावर्षीही रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक,उमेश यादवची चमकदार कामगिरी