न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्या(26 जानेवारी) दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल मैदानावर पार पडणार आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने 1-0 असा आघाडीवर आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकून भारतीय संघाला आघाडी वाढवण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या सामन्यात अनेक खेळाडूंना काही खास विक्रम करण्याचीही संधी आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे होऊ शकतात हे विक्रम –
– विराटने जर या सामन्यात 25 धावा केल्या तर तो न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गौतम गंभीरला मागे टाकेल. सध्या या यादीत विराट 8 सामन्यातील 550 धावांसह 7 व्या क्रमांकावर आहे. तर गंभीर 574 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
-तसेच वनडेमध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्याच भूमीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराटला पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सध्या तो मोहम्मद अझरुद्दीनसह संयुक्तरित्या 336 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यापुढे सचिन तेंडुलकर(652), विरेंद्र सेहवाग(598), एमएस धोनी(456), राहुल द्रविड(425) आणि अजय जडेजा(344) आहेत.
– रविंद्र जडेजाने जर 10 धावा या सामन्यात केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच यामुळे तो वनेडमध्ये 2000 धावा आणि 150 विकेट्स घेणारा जगातील 26 वा तर भारताचा तिसरा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरेल. भारताकडून असा पराक्रम याआधी कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी केला आहे.
-रोहितने या सामन्यात जर शतकी खेळी केली तर तो गांगुलीच्या 22 वनडे शतकांचा विक्रम मागे टाकेल. रोहितनेही आत्तापर्यंत 22 वनडे शतके केली आहेत. त्यामुळे तो वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत गांगुलीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 49 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल आणि 39 शतकांसह विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-मोहम्मद शमीला न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत झहीर खान आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकण्यासाठी एका विकेटची गरज आहे. तो सध्या 14 विकेटसह झहीर खान आणि अनिल कुंबळे यांच्या बरोबरीने संयुक्तरित्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 38 विकेटसह जवागल श्रीनाथ आहे.
-एमएस धोनीने जर या सामन्यात 40 धावा केल्या तर तो ब्रायन लारा यांच्या वनडेतील 10405 धावांच्या विक्रमाला मागे टाकत वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर येईल. सध्या धोनीचे वनडेत 10366 धावा आहेत.
-विराटने जर या सामन्यात शतक केले तर तो न्यूझीलंडमध्ये वनडेत शतक करणारा भारताचा पहिला कर्णधार ठरेल.
-या सामन्यात जर केदार जाधवने 55 धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–गतविजेत्या विदर्भाची यावर्षीही रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक,उमेश यादवची चमकदार कामगिरी
–वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
–सिद्धार्थ देसाईंच्या जागी या खेळाडूला संधी, असा असेल महाराष्ट्र संघ.