---Advertisement---

सिद्धार्थ देसाईंच्या जागी या खेळाडूला संधी, असा असेल महाराष्ट्र संघ.

On: शुक्रवार, जानेवारी 25, 2019 12:52 PM
---Advertisement---

भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.

सिद्धार्थ देसाई ला रेल्वे कडून “ना हरकत प्रमाणपत्र” हे मिळत नसल्यामुळे त्याला महाराष्ट्र संघात खेळता येणार नाही चित्र स्पष्ट झाले आहे. सिद्धार्थने राजीनामा दिला असला तरी त्याची मंजुरी आणि अन्य तांत्रिक बाबींमूळे त्याला ६६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळता येणार नाही.

महाराष्ट्र संघातील स्थान गमवावे लागल्यामुळे आता सिद्धार्थ देसाई राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळणार नाही. सिद्धार्थ देसाईने महाराष्ट्र संघातील स्थान गमावल्या मुळे आता महाराष्ट्राचा संघात सचिन शिंगाडेला स्थान देण्यात आले आहे.

गिरीश इरणक कडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व असून त्याचबरोबर विशाल माने (मुंबई शहर), रिशांक देवाडिका (मुंबई उपनगर), निलेश सांळुखे (ठाणे), तुषार पाटील (कोल्हापूर), विकास काळे (पुणे) या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

६६ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ:
१) गिरीश इरणक कर्णधार (ठाणे)
२) तुषार पाटील उपकर्णधार (कोल्हापूर)
३) विशाल माने (मुंबई शहर)
४) रिशांक देवाडिका (मुंबई उपनगर)
५) निलेश सांळुखे (ठाणे)
६)अमिर धुमाळ (रायगड)
७) सुनिल दुबले (पुणे)
८) सचिन शिंगाडे (सांगली)
९) संकेत बनकर (रायगड)
१०) अजिंक्य पवार (रत्नागिरी)
११) विकास काळे (पुणे)
१२) अभिषेक भोजणे (रत्नागिरी)
प्रशिक्षक: प्रताप शिंदे (मुंबई उपनगर)
व्यवस्थापक: मनोज पाटील (ठाणे)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment