भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. कर्णधार विराट कोहली नेहमी राहुलच्या सोबत असतो आणि त्याला संघामध्ये स्थान मिळण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करतो. राहुल हा एक अतिशय हुशार फलंदाज आहे आणि म्हणूनच अनेक दिग्गज खेळाडू त्याचे कौतुक करतात. याचदरम्यान राहुलला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याबद्दल विचारले असता त्याने धोनीला आपला आवडता कर्णधार सांगितले आहे.
राहुल फोब्स पत्रिकासोबत बोलताना माजी कर्णधार धोनीबद्दल विचारले गेले होते. यावर राहुल म्हणाला की, “धोनी एक असा कर्णधार आहे ज्याच्यासाठी कोणताही खेळाडू बंदुकीची गोळी देखील खाऊ शकतो. मी धोनीकडून खूप काही शिकलो आहे. आपल्या अडचणीच्या काळात कसे विनम्र राहायचे, प्रत्येक संकटाला कसे सामोरे जायचे, हे मी धोनीकडून शिकलो. धोनी प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त आपल्या देशाला अधिक महत्त्व द्यायचा, हे सर्व अविश्वसनीय होते.”
राहुलचे धोनीबद्दलचे मत
राहुल पुढे म्हणाला की, “जर कर्णधाराबद्दल बोलायचे झाले तर, या युगात किंवा पिढीतील पहिले नाव जे सर्वात पुढे येते ते म्हणजे धोनी आहे. आम्ही सर्वांनी धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक सामने खेळले आहेत आणि खूप ट्रॉफी देखील जिंकलो आहे. परंतु सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, धोनी सर्व लोकांना सन्मान देतो.”
राहुलचे विराटबद्दलचे मत
त्यानंतर पुढे राहुलला विराटबद्दल विचारले तर तो म्हणाला की, “विराट हा वेगळाच कर्णधार आहे. विराट हा एक खेळाडू म्हणून खूप उत्साही असतो. तो 200 च्या वेगाने खेळ सुरू करतो. पण आमच्यासाठी जास्तीत जास्त 100 पर्यंत पोहोचणे शक्य असते. परंतु तो 200च्या गतीने कार्य करतो. त्याच्यात उर्वरित 10 खेळाडूंना सोबत घेऊन वाटचाल करण्याची अद्भुत क्षमता देखील आहे. या सर्वांना 100 ते 200 पर्यंत कसे घेऊन जाता येईल, हे त्याला खूप चांगले माहित आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे
पुजाराचे इग्लंडविरुद्ध कसोटीत बाकावर बसणे निश्चित? दिग्गजाने सुचवला त्याचा उत्तम ‘पर्याय’
ENGvIND: शेवटच्या वनडेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार मिताली राज पूर्णपणे फिट