इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी पहिल्या डावात २० षटके खेळून काढत एका खास यादीत आणखी भर टाकली.
भारतीय सलामीवीरांची दमदार कामगिरी
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत दमदार सुरुवात केली. सावध सुरुवातीनंतर दोघांनी खराब चेंडूंवर फटके खेळत धावा वसूल केल्या. रोहित शर्मा अधिकच आक्रमक दिसत होता. त्याने अर्धशतक साजरे केले आहे.
पावसामुळे पहिले सत्र १८.४ षटकांनंतर थांबविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर दोघांनी इंग्लिश गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही व भारताने शतक फलकावर लावले.
चालू वर्षात भारतीय सलामीवीरांची खास आकडेवारी
रोहित व राहुल यांनी पहिली २० षटके खेळून काढत भारतीय सलामीवीरांच्या एका खास यादीत भर घातली. जानेवारी २०२१ पासून आशिया बाहेर भारतीय सलामीवीरांनी पाचव्यांदा पहिली २० षटके खेळून काढली आहेत. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०२० या काळात भारतीय सलामीवीरांनी अशी कामगिरी एकदाही केली नव्हती.
मागील ५ सामन्यांच्या ९ डावात भारतीय सलामीवीरांनी पाचव्यांदा २० चटके समर्थपणे खेळून काढली आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सिडनी कसोटीत रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दोन्ही डावात २० पेक्षा जास्त षटके खेळून काढली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावातही रोहित व गिल यांनी २० षटके तग धरला होता. चालू मालिकेतील पहिल्या सामन्यातदेखील रोहितने राहुलसह २० षटके आरामात खेळून काढलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुलीसोबत चर्चा करत असलेले ‘ते’ व्यक्ती कोण? आहे ‘हे’ खास नाते






