नामीबिया येथे आयसीसी विश्वचषक क्वॉलिफायर प्ले-ऑफ 2023 स्पर्धेतील सातवा सामना युनायटेड स्टेट्स विरुद्ध संयुक्त अरब अमिरात संघात गुरुवारी (दि. 30 मार्च) पार पडला. या सामन्यात युनायटेड स्टेट्सने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो भारतीय मूळ असलेला 18 वर्षीय सैतजा मुक्कमल्ला ठरला. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या सैतजा याने आव्हानाचा पाठलाग करताना शतकी खेळी साकारली. त्याने खेळीत चौकारांचा अक्षरश: पाऊस पाडला.
या सामन्यात संयुक्त अरब अमिरात संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी यूएईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 279 धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान यूएसने 49 षटकात 5 विकेट्स गमावून 281 धावा चोपत पूर्ण केले. या विजयात 18 वर्षीय सैतजा मुक्कमल्ला (Saiteja Mukkamalla) याने केलेल्या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
https://twitter.com/usacricket/status/1641546120135417856
https://twitter.com/MLCricket/status/1641537292224307217
यूएसकडून फलंदाजी करताना सैतेजा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यादरम्यान 114 चेंडूत नाबाद 120 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 11 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सैतजाचे वय 18 वर्षे आणि 355 दिवस इतके आहे. तो 9 एप्रिल रोजी 19 वर्षांच्या वयात पदार्पण करणार आहे. त्याने वाढदिवसाच्या 10 दिवस आधीच अमेरिकेसाठी यादगार खेळी साकारली. हा अमेरिकेचा आयसीसी विश्वचषक क्वॉलिफायर प्ले-ऑफ स्पर्धेतील तीन सामन्यांतील दुसरा विजय होता. या विजयानंतर अमेरिका म्हणजेच यूएस संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
सामन्याविषयी थोडक्यात
सैतजाव्यतिरिक्त यूएसकडून कर्णधार मोनांक पटेल याने 50 धावांची खेळी साकारली. तसेच, सुशांत मोदानी (39), गजानंद सिंग (23) आणि शायान जहांगीर (22) यांनी 20 धावांचा आकडा पार केला. यासोबतच संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी यूएईकडून गोलंदाजी करताना जुनैद सिद्दीक याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मुतीउल्लाह खान आणि आयान अफजल खान यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
https://twitter.com/ICC/status/1641470034143739909
तत्पूर्वी यूएईने प्रथम फलंदाजी करताना 100 धावांवरच 4 विकेट्स गमावल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वृत्या अरविंद याने 57 धावांची खेळी साकारली. त्याच्यानंतर सहाव्या स्थानी उतरलेल्या आसिफ खान याने मोर्चा सांभाळत वादळी फलंदाजी केली. आसिफने रोहन मुस्तफासोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 99 चेंडूत 105 धावांची भागीदारी रचली. असे वाटत होते की, ही जोडी 300 धावांचा आकडा पार करेल. मात्र, मुस्तफा धावबाद झाला आणि आयान खानही शून्य धावेवर तंबूत परतला. 40 षटकादरम्यान यूएईची धावसंख्या 6 बाद 207 इतकी होती. यानंतर आसिफने वेगान धावा करण्यास सुरुवात केली. त्याने 81 चेंडूत शतक केले आणि यूएईची धावसंख्या 279 धावांपर्यंत पोहोचवली. आसिफने यावेळी 84 चेंडूत एकूण 103 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. (indian origin cricketer saiteja mukkamalla with unbeaten 120 helped usa to beat uae by 5 wickets read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा किताब न जिंकणारे 4 संघ, 2 नवीन कर्णधारासोबत उतरणार मैदानात, यावेळी फळफळणार का नशीब?
आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?





