इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 आयसीसी विश्वचषकात उद्या(9 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सामना होणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघ सराव करत असताना आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा चेंडू जय किशन या भारतीय वंशाच्या ब्रिटिश वेगवान गोलंदाजाच्या डोक्याला लागला आहे.
वॉर्नर फलंदाजीचा सराव करत असताना वॉर्नरने एक शॉट मारलेला चेंडू ऑस्ट्रेलियासाठी नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी करणाऱ्या किशनच्या डोक्याला लागला. त्यामुळे वेदनेने कळवळून किशन खाली पडला. त्याला खाली पडलेले पाहुन लगेचच वैद्यकीय टीम मैदानावर आली.
चांगली गोष्ट म्हणजे किशन उपचारांना प्रतिसाद देत होता. तसेच जोपर्यंत मैदानावर किशनवर उपचार सुरु होते तोपर्यंत वॉर्नर त्याच्या बाजूला बसून होता.
किशनला त्यानंतर लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. किशनला रुग्णवाहिकेमध्ये घेऊन जाण्याआधी तो म्हणाला, ‘मला डोक्याला चेंडू लागला आहे. मी आत्ता ठिक आहे. माझे नाव जय किशन आहे आणि मी वेगवान गोलंदाज आहे.’
त्याच्याबद्दल आयसीसीचे स्थळ व्यवस्थापक मायकल गिब्सन म्हणाले, ‘सरेच्या वैद्यकीय सुविधांच्या मार्फत त्याला सावधगिरी बाळगण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना तो प्रतिसाद देत होता. आम्हाला पुढील अपडेट्स मिळाले की आम्ही ते देऊ.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: जेसन रॉयने शतक तर केलेच पण अंपायरलाही पाडले खाली, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: कर्णधार कोहलीला आशिर्वाद देण्यासाठी असा आहे त्याच्या शाळेचा अनोखा उपक्रम
–विश्वचषक २०१९: ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूला आयसीसीने दिली ताकिद, जाणून घ्या कारण