इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 2019 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला अनेक दिग्गजांनी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय संघाला या विश्वचषकासाठी विविध क्षेत्रातून अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता विराटच्या शाळेने त्याला या विश्वचषकासाठी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे.
विराटला आशिर्वाद देण्यासाठी त्याची लहानपणीची शाळा विशाल भारती पब्लिक स्कुलमधील माती लंडनला पाठवण्यात येत आहे. दिल्लीतील उत्तम नगरमध्ये असणाऱ्या विशाल विद्याभारती पब्लिक स्कुलमधून विराटने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
विराटच्या या शाळेच्या अनोख्या उपक्रमाबद्दल सामन्यांचे प्रसारकर्ता स्टार स्पोर्ट्सने ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘विराट कोहली ज्या शाळेत शिकला त्या शाळेची माती लंडनला त्याला आशिर्वाद देण्यासाठी पाठवण्यात येत आहे.’
विराटने विशाल भारती पब्लिस स्कुलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो सेंट सेवियर कॉन्वेंट शाळेत पुढील शिक्षणासाठी गेला. याचदरम्यान त्याने 1998 मध्ये पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर सुरु झालेल्या प्रवासात विराटने मागे वळून पाहिलेच नाही.
आज तो भारतीय संघाचा कर्णधार असून सध्या सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या विश्वचषकात भारताचा दुसरा सामना रविवारी(9 जून) गतविजेता ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूला आयसीसीने दिली ताकिद, जाणून घ्या कारण
–धोनीचे सिक्रेट ऑस्ट्रेलिया संघाला सांगण्यास या दिग्गज खेळाडूने दिला नकार