भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (दि. 17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने धारदार गोलंदाजी केली. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी कौतुकाचे पूल बांधले आहेत.
मोहम्मद शमीची खतरनाक गोलंदाजी
या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 188 धावांवर गाशा गुंडाळला. त्यांनी यावेळी 35.4 षटकांमध्येच दहाच्या दहा विकेट्स गमावल्या. यातील 3 विकेट्स घेण्याचा मान मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला मिळाला. शमीने ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचवी, सहावी आणि सातवी विकेट घेतली.
Australia went from 2-129 to 188 all out, losing 8-59, with Mohammed Shami taking 3-17
Check out the scorecard here: https://t.co/1NkSjErkXT#INDvAUS pic.twitter.com/tNyQO0gc63
— cricket.com.au (@cricketcomau) March 17, 2023
शमीने या सामन्यात 6 षटके गोलंदाजी करताना 17 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या. यामध्ये जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन आणि मार्कस स्टॉयनिस यांचा समावेश आहे. शमीच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियावरील दबाव वाढला आणि त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या.
शमीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया
शमीची गोलंदाजी पाहून चाहतेही त्याच्यावर फिदा झाले. ट्विटरवर चाहत्यांनी शमीचे फोटो शेअर करत त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “ओह, मोहम्मद शमी, हमें तुमसे मोहब्बत है.”
त्यानंतर दुसऱ्या एकाने शमीचा व्हिडिओ शेअर करत शमी कॅप्शनमध्ये “मोहम्मद शमी आणि उडणारे स्टंप्स” असे लिहिले.
Mohammad Shami 🤝 Flying Stumps
— Himanshu (@himanshux_) March 17, 2023
यामध्ये हातमिळवणीच्या इमोजीचाही समावेश होता. आणखी एकाने लिहिले की, “मोहम्मद शमी ऑन फायर, झटपट 3 विकेट्स.”
Mohammad shami and had 410 international wickets but never hype him like a porkis hype every bowler after 5 matches. #INDvsAUS
— Mukul sharma (@mukul8615) March 17, 2023
एकाने असेही ट्वीट केले की, “मोहम्मद शमी हा वेगाचा बादशाह असला पाहिजे. काय गोलंदाजी केलीये.”
Mohammad shami should be seam king 👑 what a spell 🔥🔥
— KL Rahul's Cover Drive (@klassykldrives) March 17, 2023
Mohammad Shami on a roll🚀
What a spell 🙌
Pure Domination by Team India 🧿#INDvsAUS— Aman Pratap Singh (@Kush_aman12) March 17, 2023
https://twitter.com/amanmishrra/status/1636680654313365505?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1636680654313365505%7Ctwgr%5E11c883d0c00b5c07ee655a690a4f02030033e68f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fmohammad-shami-fans-reactions-ind-vs-aus-1st-odi%2F
शमीव्यतिरिक्त ‘हे’ चमकले गोलंदाज
शमीव्यतिरिक्त भारतासाठी मोहम्मद सिराज याने 5.4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 3 विकेटस घेतल्या. तसेच, अष्टपैलू रवींद्र जडेजा यानेही 9 षटके गोलंदाजी करताना 46 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूंचा सामना करताना 81 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. (indian pacer mohammad shami fans reactions ind vs aus 1st odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ