---Advertisement---

टीम इंडियाला टेंशन! ‘हा’ मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त, गोलंदाजी करताना अर्ध्यातच सोडले मैदान

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 8:11 AM
Team India
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला होता, तर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात १ बाद ३५ धावा करण्यात यश आले आहे. दरम्यान, सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला (Mohammad Siraj injured) हेमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १७ व्या षटकातील ५वा चेंडू टाकण्यासाठी सिराजने रनअप घेतला आणि चेंडू टाकण्यासाठी उडी मारणार इतक्यात त्याला हेमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला. वेदनेने कळवळत असलेल्या मोहम्मद सिराजला पाहून, फिजीयोला मैदानात यावे लागले होते. त्यानंतर फिजीयोसह मोहम्मद सिराज मैदानाबाहेर गेला.

मोहम्मद सिराजच्या फिटनेसबाबत बीसीसीआयने कुठलीही माहिती दिली नाहीये. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मोहम्मद सिराजच्या पायाच्या मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत. ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आहे. मोहम्मद सिराज हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचे फिट होणे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचे आहे.

अधिक वाचा – जोहान्सबर्गमधील टीम इंडियाची ‘ती’ परंपरा ‘कॅप्टन’ राहुलमूळे अबाधित

भारतीय संघाने पहिल्या डावात केल्या २०२ धावा 
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलने १३३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५० धावांची खेळी केली, तर आर अश्विनने ५९ चेंडूंमध्ये तुफानी ४६ धावांची खेळी केली. तसेच मयांक अगरवालने ३७ चेंडूंमध्ये २६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाचा संपूर्ण डाव २०२ धावांवर संपुष्टात आला.

महत्वाच्या बातम्या : 

“फिक्सर खेळाडूंना दिला जातो मान”; निवृत्तीनंतर हफीजने काढले पीसीबीचे वाभाडे

पुजारा-रहाणेचा पुन्हा एकदा ‘फ्लॉप शो’! भारतीय दिग्गज म्हणतोय, “दुसरा डाव…”

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---