---Advertisement---

शुभमंगल सावधान! टीम इंडियाचा पेसर मुकेशची नवी इनिंग, दिव्यासह बांधली लग्नगाठ

On: बुधवार, नोव्हेंबर 29, 2023 1:22 PM
---Advertisement---

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने माघार घेतली होती. त्यानंतर आता तो मंगळवारी (28 नोव्हेंबर) विवाह बंधनात अडकला. गोरखपूर येथे त्याने दिव्या सिंग हिच्याशी सात फेरे घेतले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1729751066856587548?t=S8h8sT7P4-0xFASFJNKAPA&s=19

मुकेश आणि दिव्या यांचा साखरपुडा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडला होता. त्यानंतर मंगळवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा लग्न सोहळा पार पडला. गोरखपूर येथील महाराजगंज रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये काही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

मुकेश याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली होती. मुकेश चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात राजकोट येथे दाखल होईल.

(Indian Pacer Mukesh Kumar Married With Divya Singh In Gorakhpur)

महत्वाच्या बातम्या

मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---