भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळही मिळते. परंतु भारतीय संघात जागा मिळवण्यापेक्षा, संघातील आपले स्थान टिकवून ठेवणे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरल्याची बरीच उदाहरणे आपण पाहिली आहेत.
काही दिवसांपुर्वी बीसीसीआयने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका यासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु या संघात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या एक अनुभवी भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा संधी मिळण्यापासून वंचित राहिला आहे. हा गोलंदाज म्हणजे, जयदेव उनाडकट.
२९ वर्षीय वेगवान गोलंदाज उनाडकट मागील ११ वर्षांपासून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्याच्यानंतर येऊनही शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी या युवा वेगवान गोलदाजांनी भारतीय कसोटी संघात जागा मिळवली आहे. एवढेच नव्हे तर, अनकॅप गोलंदाज आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्झन नागवासवाला यांनीही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवले आहे. परंतु उनाडकट पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला आहे. तरीही त्याने हार न मागता आपले प्रयत्न चालू ठेवण्याचे धाडस दाखवले आहे.
भारतीय कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश याने उनाडकटला न निवडल्याने निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘उनाडकटला भारतीय कसोटी संघात जागा मिळवण्यासाठी अजून काय करावे लागेल. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करुनही त्याच्यावर पुन्हा-पुन्हा दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहून अतिशय वाईट वाटत आहे.’
डोड्डा गणेश यांच्यावर ट्विटवर प्रतिक्रिया देत उनाडकटने लिहिले आहे की, ‘तुमच्या माझ्याबद्दलच्या चिंतेने मला अजून जास्तच प्रोत्साहित केले आहे. मी आता नव्हे तर मी पुढील हंगामात माझे पुनरागमन शक्य करुन दाखवले.’
Your concern motivates me even more! Bring on the next season.. 💪🏼🔥
— Jaydev Unadkat (@JUnadkat) May 9, 2021
उनाडकटने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचा हा कसोटी पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. त्यानंतर आतापर्यंत त्याला एकदाही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु तो सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. आतापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्याने ३२७ विकेट्स चटकावल्या आहेत. दरम्यान ४१ धावांवर ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयची मोठी योजना, श्रीलंका दौऱ्यावर विराट आणि रोहितला ‘नो एंट्री’; जाणून घ्या कारण
भारत नव्हे तर ‘या’ देशात होणार आयपीएल २०२१चे उर्वरित सामने, बीसीसीआय अध्यक्षाने दिला इशारा
“मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे, पैसे इतका मोठा मुद्दा असू नये”