भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंचा चांगलाच समाचार घेतला. या विजयासह मालिकेत भारतीय संघ २-२ ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. अशातच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धुमाकूळ घालणारा गोलंदाज टी नटराजन भारतीय संघात परतला आहे.
आयपीएल २०२० च्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात सामाविष्ट होणाऱ्या नटराजनला ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तो एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने एकाच दौऱ्यावर खेळाच्या तीनही प्रकारात पदार्पण केले आहे. त्याला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत देखील संधी देण्यात आली होती. परंतु त्याला खांदा आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले होते. परंतु आता तो दुखापतीतून सावरला आहे.
नटराजन चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघातसोबत जुळला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “नटराजनने यो-यो टेस्ट आणि २ किलोमीटर धावणे अशा दोन्ही फिटनेस चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. तो काही दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये दाखल झाला होता. परंतु तो जैव सुरक्षित वातावरणाचा भाग नसल्यामुळे त्याला काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते.”
मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-२० सामना निर्णायक असणार आहे. यामुळे नटराजनची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता विराट कोहली नक्कीच त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्याचा विचार करेल.
टी नटराजनची कामगिरी
टी नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीनही प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ३ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ६ गडी बाद केले आहेत. यात ३० धावा देत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तसेच त्याला एक कसोटी सामना खेळायची संधी मिळाली आहे. यात त्याने ३ गडी बाद केले आहेत. तर त्याने आपल्या कारकीर्दीत १ वनडे सामना खेळला आहे. यात त्याने २ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या षटकात २ वाइड आणि चौकार-षटकार, शार्दुलने सांगितले कुठे उद्भवली समस्या?
‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे नक्की काय रे भावा? ज्यामुळे सूर्यकुमारच्या वादळी खेळीला लागला अनपेक्षित ब्रेक!