जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. तब्बल दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी रवाना झाला आहे. त्याचवेळी भारतीय संघाचे युवा वेगवान गोलंदाज राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे हजर झाले असून, त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज आणि सध्या भारतीय संघातून बाहेर पडलेल्या नवदीप सैनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो भारताचे युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, उमरान मलिक, चेतन सकारिया, कुलदीप सेन, शाहबाज अहमद या खेळाडूंसोबत आराम करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/Cs5lpEwNSd_/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
मागील काही काळापासून भारतीय संघात अनेक वेगवान गोलंदाजांनी पदार्पण केले होते. यातील बऱ्याच खेळाडूंना दुखापतींच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे हे खेळाडू अनेकदा सराव तसेच सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत येत असतात.
या आयपीएल हंगामात नवदीप सैनी याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये तो तीन बळी घेण्यात यशस्वी ठरला. कुलदीप सेन व शहाबाज अहमद हे मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयशी ठरले. अर्शदीप सिंग याने पंजाबसाठी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. तर उमरान मलिक व चेतन साकरीया यांना या हंगामात पुरेशी संधी मिळालेली नाही.
(Indian Pacers Click Pics In NCA Saini Umran Sen Include)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तुषार देशपांडेचा धोनीबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा! म्हणाला, “खराब गोलंदाजी केल्यावर त्याने मला खूप…”
करेन तर हीच! क्रिकेटरनेच केलं ऋतुराजला क्लीन बोल्ड, महाराष्ट्र संघाची शान आहे गायकवाडांची सून