---Advertisement---

वो हसीना बडी सुंदर! हरली देओलचे गोल्फ कोर्सवरील फोटोंनी चाहत्यांना भुरळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

On: रविवार, ऑक्टोबर 10, 2021 3:33 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाची महत्वाची खेळाडू हरलीन देओलही या दौऱ्यावर संघासोबत आहे. हरलीन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी सतत नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकताच आपला एक नवीन फोटो चाहत्यांसाठी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.

या फोटोत हरलीन गोल्फरच्या लूकमध्ये दिसत आहे. तिने या फोटोत नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट पँट घातलेली आहे. तसेच तिने डोळ्यांवर टी-शर्टला मॅचिंग असणारे सनग्लासही घातलेले दिसत आहेत. चाहत्यांना हरलीनचा हा लूक चांगलाच भावलेला दिसत आहे.

हरलीनचा हा नवीन फोटो सोशल मीडियावर येताच प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या या नवीन फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. हरलीन सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असली तरी तिला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. अशातच ती गोल्फ खेळताना दिसत आहे. तिने गोल्ड कोस्टच्या क्वींन्सलँडमध्ये असलेल्या गोल्फ कोर्सवर जाऊन गोल्फचा आनंद घेतला आहे.

https://www.instagram.com/p/CUxB8Qfvtai/?utm_source=ig_web_button_share_sheet

यावर्षी जुलैमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात हरलीनने एक अप्रतिम झेल घेतला होता. तिने घेतलेल्या झेलमुळे सोशल मीडियावर सर्वत्र तिच्या नावाची चर्चा झाली होती. तिने घेतलेल्या या झेलनंतर तिला ‘सुपरवुमेन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. हरलीनने इंग्लंडमध्ये घेतलेल्या त्या झेलसाठी तिचे भारताच्या पंतप्रधान, क्रिडा मंत्री, प्रियंका गांधी यांच्यासह सचिन तेंडुलरकनेही कौतुक केले होते. सचिनने हा वर्षातला सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटले होते.

हरलीनचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारतीय संघाच्या टी-२० संघामध्ये समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असून मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा ४ विकेट्सने पराभव झाला  आहे. हरलीनला या दुसऱ्या सामन्यताही सहभागी करण्यात आले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या-

नुसती ‘रनमशीन’ नाही तर ‘सिक्सरमशीन’ही, आयपीएल २०२१च्या साखळी सामन्यांत ‘या’ धुरंधराने मारलेत सर्वाधिक षटकार

दिल्लीविरुद्धच्या ‘मॅच विनिंग’ षटकाराबाबत भरत अन् कोहलीमध्ये ड्रेसिंग रूममध्ये झाला ‘असा’ संवाद- VIDEO

पहिल्या क्वालिफायरमध्ये गुरू-शिष्य बनणार ‘विक्रमवीर’, धोनी करणार अनोखा विक्रम तर रिषभ रचणार इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---