भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) विरोधी संघ देखील घाबरताना दिसतात. मात्र, आता सिराज क्रिकेटसोबत आणखी एक इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांना तेलंगणा पोलिसात नवी जबाबदारी मिळाली आहे. सिराजला पोलिस उप-अधीक्षकपद (DSP) मिळाले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंड रेड्डी (Revanth Reddy) यांनी यापूर्वीच सिराजला सरकारी पद देण्याची घोषणा केली होती.
तेलंगणा पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सिराजबद्दल पोस्ट केले. त्यांनी एक्सवर माहिती शेअर करत लिहिले की, “भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला त्याच्या क्रिकेटमधील कामगिरी आणि राज्याप्रती समर्पणाच्या सन्मानार्थ तेलंगणाचे डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आपल्या नव्या भूमिकेने तो अनेकांना आपली क्रिकेट कारकीर्द पुढे नेण्यासाठी प्रेरित करेल.”
मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) पोस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्याला हैदराबादमध्येच पोस्टिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिराजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 78 विकेट्स घेतल्या. 15 धावांत 6 विकेट्स ही सिराजची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्याने भारतासाठी 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने 16 टी20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction 2025; मेगा लिलावात लखनऊचे ‘हे’ स्टार खेळाडू ठरणार अनसोल्ड?
IND vs NZ; “लढण्यासाठी आम्ही सज्ज…” कसोटी मालिकेपूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य
टी20 विश्वचषक फायनल नाही, तर भारत-दक्षिण आफ्रिकेचा हा सेमीफायनल सामना थरारक!