भारतीय संघ सध्या (19 सप्टेंबर) पासून घरच्या मैदानावर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. दोन्ही कसोटी सामने चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी भारतीय क्रिकेटपटू पियुष चावलाची (Piyush Chawla) व्हायरल झालेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. कारण त्याने आता त्याच्या निवृत्तीबाबत ‘पृथ्वी शॉ’ला दिलेले उत्तर चर्चेत आहे.
यूट्यूबर शुभंकर मिश्राने पियुष चावलाला विचारले होते की तो किंवा एमएस धोनी आधी निवृत्ती घेणार का? यावर त्याने उत्तर दिले की, धोनी आधी निवृत्त होईल. पृथ्वी शॉसोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून देताना चावला म्हणाला, “काही वेळापूर्वी पृथ्वी शॉने मला सांगितले होते, ‘पीयूष चावला भाई, आता थांब.’ मी म्हणालो की मी सचिन पाजी बरोबर खेळलो आहे आणि आता मी तुझ्या बरोबर खेळतो आहे आणि मग तुझ्या मुलाबरोबर खेळून मी निवृत्त होईन.”
याआधी मोहम्मद शमीनेही (Mohammed Shahmi) काही काळापूर्वी यूट्यूबर शुभंकर मिश्राला मुलाखत दिली होती. शमीने खुलासा केला की, त्याने एकदा एमएस धोनीला खेळाडूने कधी निवृत्ती घ्यावी असा प्रश्न विचारला होता. शमीच्या म्हणण्यानुसार, एमएस धोनीने त्याला सांगितले की, “एक म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःला कंटाळा येऊ लागतो किंवा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला संघातून लाथ मारली जाईल.”
पियुष चावलाचे (Piyush Chawla) वय सध्या 35 वर्ष 264 दिवस आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 3 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी20 सामने खेळले आहेत. 3 कसोटी सामन्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 3.29 राहिला. 25 एकदिवसीय सामन्यात त्याने 34.90च्या सरासरीने 32 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत, तर 7 टी20 सामन्यात त्याने 37.75च्या सरासरीने 4 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रात्री अडीच वाजता मैसेज करुन रोहितने पियुष चावलाला खोलीत बोलवलं, मग पुढे काय घडलं?
‘..नजर लग जाएगी’, एलिसा पेरीच्या फोटोंवर चाहते फिदा
‘BGT’ ट्राफीपूर्वी स्मिथ, कोहलीबद्दल दिग्गज खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी