‘क्रिकेटचा देव’ म्हणून महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओळखले जाते. आता सचिनचे अनेक रेकाॅर्ड्स हळूहळू काही दिग्गज खेळाडू मोडीत काढताना दिसत आहेत. पण त्याच्याकडे शंभर शतकांचा रेकाॅर्ड आहे, जो अजूनही कायम आहे. तेंडुलकरनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 80 शतके झळकावली आहेत. पण सचिनची कारकिर्द एका लाजिरवाण्या रेकाॅर्डने डागाळली नसती, तर त्याचा रेकाॅर्ड अतूट राहिला असता.
‘मास्टर ब्लास्टर’च्या नावावर जगात सर्वाधिक 100 शतके आहेत. सचिनच्या नावावर लज्जास्पद रेकाॅर्ड्सची नोंद झाली नसती, तर हा शतकांचा आकडा आणखीनच आश्चर्यकारक ठरला असता. सचिनचा कदाचित हा एकमेव रेकाॅर्ड असेल, जो कोणीही मोडू शकत नाही. सचिनच्या कारकिर्दीचा रेकाॅर्ड केवळ शतकांशीच नव्हे, तर 90 धावसंख्येच्या जवळ देखील आहे.
1989 ते 2013 या काळात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) अनेक रेकाॅर्ड केले, पण तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जास्तीत जास्त 28 वेळा नव्वदीच्या घरात फलंदाजी करताना बाद झाला आहे. असे झाले नसते तर 100 नव्हे तर 120 हून अधिक शतके सचिनच्या नावावर नोंदली गेली असती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDW vs SLW; शानदार विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत
IND vs BAN; दुसऱ्याही सामन्यात भारताचा शानदार विजय
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!