जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023मधून आनंदाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने कोव्हिड- 19 नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या कोव्हिड-19 पॉलिसीनुसार, संक्रमित खेळाडूंना 5 दिवस आयसोलेशनमध्ये घालवावे लागतात. मात्र, आयसीसीच्या धर्तीवर बीसीसीआय हा नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. आयसीसीकडून बीसीसीआयला कोरोना पॉझिटिव्ह असूनही खेळाडूंना खेळवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
आयसीसीने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपले नियम बदलले होते. त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असूनही खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली होती. तसेच, सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेबाबत बोलायचं झालं, तर बीसीसीआयच्या नियमानुसार, संक्रमित खेळाडूला स्वत:ला 7 दिवस आयसोलेट करावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोनामुळे संघाचा भाग बनू शकला नव्हता. मात्र, आता लक्षण नसणाऱ्या संक्रमित खेळाडूंना मैदानावर खेळता येणार आहे. बीसीसीआयकडून हा बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, “आम्ही चर्चा करत आहोत की, आम्हाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोरोना नियमात बदल केला पाहिजे का. तसेच, यावर आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. आमच्याकडे आयपीएल 2023साठी जुने कोरोना नियम आहेत, जेणेकरून कोरोना वाढला, तर संक्रमणाची जोखीम कमी केली जाऊ शकेल. मात्र, सर्व खेळाडू आणि अधिकारी बूस्टर डोससोबतच व्हॅक्सिनेटेड आहेत. त्यामुळे याचा त्रास होणार नाही.”
आयसीसीचे म्हणणे काय?
ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2022मध्ये आयसीसीने सर्व आवश्यक जैवसुरक्षा प्रोटोकॉल काढून टाकले होते. तसेच, संघाचे डॉक्टर यावर आवश्यक पावले उचलतील असे सांगितले होते. डॉक्टर ठरवतील की, जर संघाचा खेळाडू खेळण्याच्या स्थितीत असेल, तरच मैदानावर उतरेल. जर खेळण्यास सक्षम नसेल, तर त्याला आयसोलेट व्हावे लागेल.
बीसीसीआयचा नियम काय आहे?
बीसीसीआयच्या सध्याच्या कोव्हिड नियमानुसार, खेळाडूंना स्वत:ला पाच दिवस आयसोलेट करावे लागेल. त्यानंतर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी खेळाडूला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी चाचणीतूनही जावे लागते. (indian players can play after being covid positive in wtc final 2023 bcci can change his policy read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाप क्रिकेटर! चक्रवर्तीने नवजात मुलगा अन् पत्नीला समर्पित केला ‘सामनावीर’ पुरस्कार; म्हणाला, ‘आता मी…’
चार पराभवांनंतर मिळवलेल्या दणदणीत विजयाने कॅप्टन राणा खुश; म्हणाला, ‘आम्हाला माहिती होतं…’