भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज केएल राहुलने तुफानी शतक झळकावले आहे. हे शतक झळकावल्यानंतर संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले आहे.
इंग्लिश कर्णधार जो रूटने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. सुरूवातीला केएल राहुलने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या रोहित शर्माला साथ देत शतकी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा ८३ धावा करत माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुलने जबाबदारी स्वीकारत चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. त्याने २१२ चेंडुंमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि एकमात्र षटकार लगावला होता.
त्याने शतक झळकावल्यानंतर लॉर्ड्स स्टेडियमच्या गॅलरीतून रवींद्र जडेजा, रिषभ पंत, प्रशिक्षक आणि इतर सहकाऱ्यांनी उभे राहून त्याचा गौरव केला. सोबतच टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. (Indian players celebration after kl rahul’s century from lords gallary)
A moment celebrated by his teammates and staff on the Lord's Away Dressing Room balcony 👏#LoveLords | #ENGvIND pic.twitter.com/RlggKqaz38
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 12, 2021
पहिल्या दिवस अखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून १२४ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ८३ धावांचे योगदान दिले होते. तर चेतेश्वर पुजारा या डावात देखील पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. तो अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.
तसेच कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलसोबत मिळून चांगली फलंदाजी केली. परंतु तो देखील अर्धशतक झळकावण्याच्या वाटेवर असताना ४३ धावा करून माघारी परतला. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाच्या एकूण धावा ३ बाद २७६ आहेत. तर केएल राहुल नाबाद १२७ आणि अजिंक्य रहाणे १ धाव करून मैदानावर टिकून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे..! अंधारामुळे बाद झाला रोहित शर्मा? वाचा नेमकं काय घडलं ते….
सलामीवीर म्हणून रोहितचाच बोलबाला! वाचा ‘ही’ आकडेवारी