आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 क्रिकेटची सुरुवात सर्वप्रथम 2005 मध्ये झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलंड, असा तो पहिलाच टी-20 सामना होता. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पहिला टी-20 सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. ज्यात विरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाचा कर्णधार होता.
“भारताने त्यानंतर आपला दुसरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना थेट 2007 च्या विश्वचषकात खेळला होता. त्यामुळे भारताकडून टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अनेक खेळाडूंनी विश्वचषकातील सामन्यांमध्ये आपले पदार्पण केले होते.”
खरेतर कोणत्याही खेळाडूसाठी टी-20 कारकिर्दीतील पहिलाच सामना थेट विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणे, ही नक्कीच गौरवाची बाब आहे.
2007 चा विश्वचषक हा पहिलाच टी-20 विश्वचषक होता. जो चषक भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आपल्या नावावर केला होता. याच विश्वचषकात अनेक भारतीय खेळाडूंनी पदार्पण केले होते.
2007 नंतर 2009, 2010, 2012, 2014, 2016 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा झाली होती. यातील 2012 आणि 2016 या वर्षातील विश्वचषक सोडल्यास इतर प्रत्येक विश्वचषकात भारतीय संघाकडून एखाद्या तरी खेळाडून आपल्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे.
या लेखात आपण असे काही भारतीय खेळाडू पाहणार आहोत, ज्यांची टी-20 कारकिर्द ही थेट विश्वचषकातील सामन्यातून सुरु झाली आहे.
क्रमांक – 1
गौतम गंभीर विरुद्ध स्कॉटलंड (2007 टी-20 विश्वचषक)
(सामना रद्द)
क्रमांक – 2
युवराज सिंह विरुद्ध स्कॉटलंड (2007 टी-20 विश्वचषक)
(सामना रद्द)
क्रमांक – 3
रॉबिन उथप्पा विरुद्ध स्कॉटलंड (2007 टी-20 विश्वचषक)
(सामना रद्द)
क्रमांक – 4
आर.पी. सिंह विरुद्ध स्कॉटलंड (2007 टी-20 विश्वचषक)
(सामना रद्द)
क्रमांक – 5
रोहित शर्मा विरुद्ध इंग्लंड (2007 टी-20 विश्वचषक)
या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी केली नाही. मात्र, क्षेत्ररक्षण करताना त्याने एक झेल घेतला होता.
क्रमांक – 6
जोगिंदर शर्मा विरुद्ध इंग्लंड (2007 टी-20 विश्वचषक)
भारतीय गोलंदाज जोगिंदर शर्माने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 4 षटके टाकली होती. त्यात त्याने 57 धावा दिलया होत्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. क्षेत्ररक्षण करताना जोगिंदरने एक उपयुक्त झेल घेतला होता.
क्रमांक – 7
युसूफ पठाण विरुद्ध पाकिस्तान (2007 टी-20 विश्वचषक)
भारताचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने आपल्या पदार्पण सामन्यात 8 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. तसेच क्षेत्ररक्षण करताना 1 झेल घेतला होता.
क्रमांक – 8
प्रज्ञान ओझा विरुद्ध बांगलादेश (2009 टी-20 विश्वचषक)
भारताचा हुकमी स्पीनर गोलंदाज प्रज्ञान ओझाने आपल्या या पदार्पणाच्या सामन्यातच अफलातून कामगिरी केली होती. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 21 धावांच्या मोबदल्यात 4 बळी टिपले होते. तसेच 1 महत्वाचा झेलही घेतला होता. ओझाच्या या कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
क्रमांक – 9
मुरली विजय विरुद्ध अफगाणिस्तान (2010 टी-20 विश्वचषक)
भारतीय फलंदाज मुरली विजयने आपल्याल पहिल्याच टी-20 सामन्यात 46 चेंडूत 48 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
क्रमांक – 10
पियुष चावला विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2010 टी-20 विश्वचषक)
पियुष चावलाने आपल्या पहिल्याच टी-20 पदर्पणात 3 षटके टाकली होती. ज्यात त्याने 27 धावा देत 1 विकेट आपल्या खात्यात जमा केली होती. महत्वाचे म्हणजे क्षेत्ररक्षण करताना चावलाने संघासाठी 2 अप्रतिम झेल घेतले होते.
क्रमांक – 11
विनय कुमार विरुद्ध श्रीलंका (2010 टी-20 विश्वचषक)
विनय कुमारने टी-20 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करताना उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावांच्या मोबदल्यात संघाला 2 बळी मिळवून दिले होते.
क्रमांक – 12
मोहम्मद शमी विरुद्ध पाकिस्तान (2014 टी-20 विश्वचषक)
भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीने 2014 साली टी-20 विश्वचषकात पदार्पण केले होते. शमीने आपल्या पहिल्या वीस षटकीय सामन्यात 4 षटके टाकली होती. ज्यात त्याने 31 धावा देत 1 विकेट मिळवली होती.
क्रमांक – 13
मोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014 टी-20 विश्वचषक)
मोहितचा पहिला सामना हा त्याला आठवणीत राहिल असाच होता. या खेळाडून आपल्या पहिल्या टी-20 सामन्यात 2 षटके टाकत अवघ्या 11 धावांमध्ये एका खेळाडूला तंबूत धाडले होते.
भारतीय क्रिकेटपटूंच्या पदार्पणासंबंधीत काही खास नोंदी :
कोणत्या खेळाडूला संघ व्यवस्थापनाने थेट विश्वचषकात खेळण्याची संधी देणे, ही खरे तर गौरवाची बाब म्हणावी लागेल. त्यातही खेळाडूसाठी हा अविस्मरणीय क्षण असतो. कारण व्यवस्थापनाचा तुमच्यावर किती विश्वास आहे, याचे ते एक प्रतिबिंब असते.
भारतीय संघाकडून ज्याप्रमाणे टी-20 विश्वचषकात टी-20 कारकिर्दाच्या पदार्पणाची संधी काही खेळाडूंना मिळाली. अगदी तशीच संधी एकदिवसीय सामन्यांबाबत देखील आहे. भारताकडून आपला पहिला वनडे सामना थेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे भाग्य 6 खेळाडूंना लाभले आहे.
भारताकडून वनडे विश्वचषकात पदार्पण करत एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात करणारे 6 खेळाडू;
- नवज्योत सिंग सिद्धू
- अजय जडेजा,
- कर्सन घावरी
- अंशुमन गायकवाड
- मोहिंदर अमरनाथ
- सुरिंदर खन्ना
आंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत ‘या’ खेळाडूची ‘ही’ खास बाब तुम्हाला नक्कीच माहित नसेल;
भारताचा तडाखेबाज फलंदाज आणि गुणवान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसीसीकडून (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये पदार्पण करणारा बहुदा एकमेव भारतीय खेळाडू असावा.
युवराजने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात नैरोबी येथे 2000 साली झालेल्या आयसीसी चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली केली होती. तर 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली युवराजने आपल्या टी-20 कारकिर्दीला सुरुवात केली होती.