भारतीय संघ आगामी जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सर्वप्रथम न्यूझीलंड विरुध्द विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने कसून तयारी सुरू केली आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने दौऱ्यापूर्वी खेळाडूंना सगळे कोरोनाचे प्रोटोकॉल पार करणे आवश्यक आहे. याच अंतर्गत सध्या सगळे खेळाडू मुंबईमध्ये बायो बबल मध्ये राहत आहेत. त्यानंतर सगळे खेळाडू इंग्लंडसाठी उड्डाण घेतील.
पण विलगीकरणात आणि बायो बबल मध्ये राहणे, हे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या पण थकवणारे असते. त्यामुळे या वातावरणात स्वतःला फिट ठेवणे खेळाडूंसाठी आवश्यक असते. ज्यासाठी सगळेच खेळाडू विविध युक्त्या करत असतात. मुंबईतील भारतीय खेळाडूंनी देखील अशाच काही युक्त्यांचा वापर केला आहे. याची व्हिडिओ आणि फोटो आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
मागील काही दिवसात भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवाल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या वर्कआऊटचे फोटो समोर आले आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रील मोहम्मद शमीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो डम्बेल्ससह व्यायाम करतांना दिसून येतो आहे. शमी ऑस्ट्रेलिया दौर्यावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता.
https://www.instagram.com/p/CPSOq1blcCB/?utm_source=ig_web_copy_link
इशांत पण करतो आहे व्यायाम
दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने देखील आपल्या हॉटेल रूम मधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो देखील व्यायाम करतांना दिसून येत आहे. तो वेग वाढवण्यासाठीच्या व्यायामावर भर देतो आहे. त्याने रनिंग प्लॅंक, वॉल स्लाईड आणि हॅमस्ट्रिंग वर काम केले असल्याचे दिसून आले आहे.
मयंक अगरवाल करतो आहे योगा
भारताचा सलामी फलंदाज मयंक अगरवाल सध्या योगा करतो आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर योग करतानाचे फोटो टाकले आहे. आपल्या फिटनेससाठी त्याने योगाचा मार्ग निवडल्याचे दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीला माफी नाही! १८ वर्षीय नसीम शाहला नडली मोठी चूक; ‘या’ मोठी स्पर्धेतून काढले बाहेर
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
स्टीव्ह स्मिथ आता बनणार नाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? दिग्गज क्रिकेटपटूने दिले ‘हे’ उत्तर