लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण ही मालिका १-१ च्या बरोबरीत होती. दरम्यान भारतीय संघाने इंग्लंड संघावर चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवत २-१ ची विजयी आघाडी घेतली. हा सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्याचा निकाल आता समोर आला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवताच सर्व खेळाडूंना कोरोना चाचणी करण्यासाठी घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान कर्णधार विराट कोहली सह सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचा निकाल आला असून, भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या निकालात एकही भारतीय खेळाडूची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली नाहीये. तसेच कुठल्याही खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही.
त्याचे झाले असे की, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. आरटी पीसीआर चाचणी केल्यानंतर ते कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. रवी शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांची देखील को चाचणी पॉसिटीव्ह आली होती. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच अंतिम कसोटी सामन्यासाठी हे तिघेही भारतीय संघासोबत नसणार आहेत.(Indian players got corona test after winning the oval test,report came out)
मालिकेतील अंतिम कसोटी सामना १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रशिक्षकांची कमतरता जाणवू शकते. या सामन्यात विजय मिळवून किंवा अनिर्णित ठेवून भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे. तर इंग्लंडला मालिका वाचवण्यासाठी विजयाचीच गरज आहे. कारण भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जार्वो’ पुन्हा चर्चेत, भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मानले आभार; पण काय आहे कारण?
मैदानाबाहेर घेऊन गेल्यानंतर जार्वोसोबत नक्की काय घडले? पाहा हा व्हिडिओ