---Advertisement---

कुछ हटके! भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने झेल घेण्याच सराव; आयसीसीकडून व्हिडिओ शेअर

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 8:08 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) रात्री पार पडणार आहे. हा सामना दुबई आंरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केला गेला असून दोन्ही संघांसाठी यामध्ये विजय मिळवने महत्वाचे असणार आहे. पाकिस्तानने या दोन्ही संघांचा त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव केला आणि विश्वचषकात सलग तीन विजय मिळवून उपांत्य सामन्याच्या शर्यतीत स्वत:चे स्थान मजबूत केले आहे. आता भारताला उपांत्य सामन्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंडला पराभूत करणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान सामन्यापूर्वी भारतीय संघाचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खेळाडू सराव सत्राचा आनंद घेत आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना एका वेगळ्याच पद्धतीने सराव करताना पाहिले गेले आहे. आयसीसीने खेळाडूंचा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यांच्यासह संघातील सर्व खेळाडू आहेत. खेळाडू एका वेगळ्या प्रकारे झेल घेण्याचा सराव करताना दिसत आहेत.

व्हिडिओत  एका खेळाडूने डोक्यात हेल्मेट घातले आहे आणि तो हवेतून येणाऱ्या चेंडूला तो डोक्याने मारत आहे, ज्यामुळे चेंडूची दिशी बदलते आणि इतर खेळाडू त्याला झेलण्याचा प्रयत्न करत आहेत. चाहत्यांना खेळाडू ज्याप्रकारे सराव करत आहेत, हे पाहून खूप आनंद झाल्याचे दिसते. चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच आयसीसीने चाहत्यांना व्हिडिओला शीर्षक द्यायला सांगितले आहे.

https://www.instagram.com/reel/CVrelWVF0QS

दरम्यान, भारताने विश्वचषाकत न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही पराभूत केलेले नाही. भारत आणि न्यूझीलंड संघ विश्वचषकात आतापर्यंत दोन वेळा आमने सामने आले आहेत आणि दोन्ही वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे. अशात रविवारच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात संघ हा विजयाचा दुष्काळ संपवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटने ती गोष्ट करावी, जी धोनी नेतृत्व करताना करायचा, हरजभजन सिंगचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ पाच भारतीय खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार

Video: पत्रकारांवर भडकला अफगाणिस्तानचा कर्णधार; म्हणाला, ‘क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---