भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दमदार फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. आता दुसऱ्या डावात भारताची एकूण ३६८ धावांची आघाडी झाली आहे, आणि अशा स्थितीत सामना वाचवण्याचा दबाव यजमानांवर आला आहे. दुसऱ्या डावादरम्यान भारतीय फलंदाजानी एका आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारतीय संघाच्या ६ किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाजांनी पहिल्यांदाच कोणत्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये ४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर रोहित शर्माने जबरदस्त १२७ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४६ धावा करून त्यास चांगली साथ दिली. पुजाराने संयमी अर्धशतक करत ६१ धावा केल्या. कर्णधार विराटने ४४ धावा केल्या. रिषभ पंत आणि शार्दूल ठाकूर यांनी दमदार अर्धशतक केले. पंतने ५० तर ठाकूरने ६० धावा केल्या. या ६ फलंदाजांच्या जोरावर तसेच बुमराह (२४) आणि उमेश यादवने (२५) फटकेबाजी करत झटपट धावा केल्याने भारतीय संघाने ३६८ धावांचे आव्हान इंग्लंडपुढे उभे केले.
यापूर्वी कसोटी सामन्यातील त्यांच्या दुसऱ्या डावात भारताचे ६ शिलेदार मिळून ४० पेक्षा जास्त धावा करु शकले नव्हते.
याआधी, चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावासाठी ९९ धावांची आघाडीही घेतली होती.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या होत्या. रोरी बर्न्स ३१ आणि हसीब हमीद ४३ धावा करत खेळपट्टीवर उभे होते. दोन्ही संघ दमदार क्रिकेट खेळत आहेत. अजूनही सामना कोणत्या बाजूला झुकेल? हे सांगता येणार नाही त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ जबरदस्त होईल यात शंका नाही
महत्त्वाच्या बातम्या-
लढवय्या शिलेदार…! जखमा घेऊन रोहितची शतकी झुंज, पाहा त्याच्या वेदनांची जाण करुन देणारे फोटो
चौथी कसोटी जिंकण्याच्या मार्गावर असलेली ‘विराटसेना’ काळजीत, रोहित-पुजाराच्या दुखापतीवर आली अपडेट