वर्ल्डकप… खेळ कोणताही असो त्याचं सर्वोच्च व्यासपीठ म्हणजे वर्ल्डकप. ज्यावेळी खेळाडू खेळ खेळायला लागतो त्यावेळी तो पहिलं स्वप्न बघतो की मला कधीतरी देशासाठी वर्ल्डकप खेळायचाय. क्रिकेटमध्ये दर चार वर्षांनी वनडे वर्ल्डकपच धुमधडाक्यात आयोजन होतं. जगातील टॉप टीम अन त्या टॉप टीमचे टॉप प्लेयर. या इतक्या मोठ्या स्टेजवर प्रत्येक जण आपला खेळ दाखवायला आतुर असतो, पण काहीवेळा त्यांच दुर्दैव असं काही आडवा येतं की, टीममध्ये असूनही वर्ल्डकपच्या एकाही मॅचच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना जागा मिळत नाही.
आज आपण अशाच काही निवडक इंडियन क्रिकेटर्सबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांना वर्ल्डकप टीममध्ये निवडलं खरं, पण फक्त पाणी वाटायला ठेवलं, म्हणजे ज्यांना इलेव्हनमध्ये स्थान दिलेच नाही.
अंबाती रायुडू
वर्ल्डकप टीममध्ये जागा भेटूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळण्याच्या बाबतीत सर्वात दुर्दैवी खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतले जाईल, तो भारतीय क्रिकेटर अंबाती रायुडू. २०१५ ला ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप पार पडला. धोनीच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया आपला वर्ल्डकप राखायला गेलेली. टीममध्ये अंबाती रायडूला जागा मिळाली. टीमने सेमीफायनलपर्यंत प्रवास केला पण रायुडूला काही चान्स मिळाला नाही.
हेही पाहा- नशीब रुसलं अन् निवड होऊनही मॅच न खेळताच भारतात परतलेले ५ दुर्दैवी खेळाडू
त्यावेळी टीममध्ये मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि खुद्द कॅप्टन एमएस धोनी असल्याने रायुडू अनलकी ठरला. त्याच्या नशिबाने फक्त इथेच धोका दिला नाही. चार वर्षांनी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी त्याची जागा जवळपास फिक्स मानली गेली. ऐनवेळी सिलेक्शन कमिटीच्या एमएसके प्रसाद यांनी थ्रीडी प्लेयर म्हणत ऑलराऊंडर विजय शंकरला चान्स दिला. हे प्रकरण चांगलंच गाजलं. रायुडूने तडकाफडकी रिटायरमेंट घेतली, पण रायुडूच वनडे वर्ल्डकप खेळायचं राहूनच गेलं.
इरफान पठाण
पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच असलेला स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण वनडे वर्ल्डकपच्या बाबतीत कमनशिबी ठरला. २००३ वर्ल्डकपनंतर टीम इंडियात बरेच बदल झाले. झहीर खानच्या जोडीला डावखुरा स्विंग बॉलर आणि आक्रमक बॅटिंग करायला सक्षम असलेला इरफान पठाण आला. चार वर्षे पठ्ठ्याने कंसिस्टंट परफॉर्मन्स दिला. २००७ ला कॅरेबियन बेटांवर वर्ल्डकप होणार होता. टीमचे सिलेक्शन झालं आणि त्यात इरफानचं नाव आलं. फक्त नावाच आलं. त्या वर्ल्डकपला टीम इंडियाचा पक्का बाजार उठला. द्रविडच्या कॅप्टन्सीत खेळलेली टीम इंडिया बांगलादेशकडून हरली आणि पहिल्याच राऊंडला बाहेर झाली. टीमच पुढे न गेल्याने इरफानचा वर्ल्डकप डेब्यू राहिला तो कायमचाच.
पार्थिव पटेल
या यादीतील तिसरं नाव म्हणजे पार्थिव पटेल. पार्थिव पटेलला अगदी कोवळ्या वयात वर्ल्डकप टीमचा भाग बनायचं नशीब लाभलं. २००३ वर्ल्डकपला सतराव्या वर्षी तो एकमेव स्पेशालिस्ट विकेटकिपर होता, पण कॅप्टन गांगुलीच डोकं चाललं आणि एक्स्ट्रा बॅटर खेळवता येईल म्हणून त्यान द्रविडच्या हातात ग्लोव्हज दिले. द्रविडने पूर्ण वर्ल्डकपमध्ये विकेटकिपिंग केली आणि पार्थिवचा वर्ल्डकप डेब्यू करायचा चान्स हुकला. पुढे त्याच्या करिअरमध्ये टीम इंडियान आणखी चार वर्ल्डकप खेळले, पण त्याची साधी संघात निवडही होऊ शकली नाही.
संजय बांगर
काही वर्ष टीम इंडियात ऑर्डरची जागा पक्की केलेल्या संजय बांगर यांना ही वर्ल्डकप मॅच नशिबी आली नाही. २००३ वर्ल्डकपला टीम इंडियाचा कॉम्बिनेशन असं काही फिट बसलं की, पार्थिव पटेलसोबतच ऑलराऊंडर संजय बांगर यांनाही वर्ल्डकप डेब्यू करता आला नाही. ऑल राऊंडर म्हणून त्यांना एक तरी मॅच मिळेल असं सर्वांना वाटत होतं, पण ही फक्त शक्यताच राहिली. पुढे इरफान पठाण, अजित आगरकर या यंग ब्रिगेड पुढे त्यांचा निभाव लागला नाही, आणि आणि ते लवकरच इंटरनॅशनल क्रिकेटमधून बाहेर झाले. मात्र, याच संजय बांगर यांनी दोन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला कोचिंग दिली.
सुनील वलसान
या यादीतील अखेरचे नाव आहे सुनील वलसान यांचे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकणार्या टीम इंडियाचे सुनील वलसान सदस्य होते. विशेष म्हणजे १४ जणांच्या टीममधील ते एकमेव असे खेळाडू होते ज्यांना वर्ल्डकप डेब्यू करता आला नाही. सुनील वलसान यांचे दुर्दैव म्हणजे ते कधीही भारतासाठी खेळले नाहीत. ते जगातील कदाचित एकमेव असे क्रिकेटपटू असतील, ज्यांच्याकडे वर्ल्डकप मेडल आहे पण ते इंटरनॅशनल मॅच खेळले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार होता युसुफ, इरफानचा भाऊ ओळख पुसत त्याने स्वत:ची बनवलेली ओळख
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला