आजवर क्रिकेट जगतात अनेक विक्रम तयार झाले आणि मोडीतही निघाले. त्यातील काही विक्रम तर अचंबित करणारे आहेत. ज्यामध्ये मुख्यत: एका संघाने एका डावात केलेल्या सर्वाधिक धावा किंवा एका संघाने सर्वाधिक धावफरकाने जिंकलेला सामना. मात्र, क्रिकेटमध्ये याच्या एकदम विपरित असा देखील विक्रम घडलेला आहे, जो त्यार होऊन आज ११५ वर्ष झाले तरी तो विक्रम मोडने कोणालाही शक्य झालेला नाही. तो विक्रम आहे एका डावात सर्वात कमी धावांवर सर्वबाद होण्याचा.
आजपासून बरोबर ११५ वर्षांपूर्वी म्हणजेच ११ जून १९०७ रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक मोठा करिष्मा घडला होता. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये या दिवशी नॉर्थम्प्टनशायरचा संपूर्ण संघ केवळ १२ धावांवर बाद झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही आतापर्यंतची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
हा काउंटी सामना नॉर्थम्प्टनशायर आणि ग्लुसेस्टर यांच्यात खेळला गेला होता. या तीन दिवसीय सामन्यात ग्लॉसेस्टर संघाला पहिल्या दिवशी केवळ ६० धावा करता आल्या. नॉर्थम्प्टनशायरचे गोलंदाज जीजे थॉम्पसन आणि डब्ल्यू ईस्टने ५-५ बळी घेतले. यानंतर नॉर्थहॅम्प्टनशायरची पाळी आली तेव्हा संपूर्ण संघ अवघ्या १२ धावांत गारद झाला. या १२ धावा ११.३ षटकात केल्या. या डावात नॉर्थम्प्टनशायरचे ६ फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. ग्लुसेस्टरचा गोलंदाज ईजी डेनेटने ६ षटकांत ८ धावा देत ८ बळी घेतले.
तरीही नॉर्थम्प्टनशायरने सामना वाचवला
एवढ्या कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाल्यानंतर संघाला सामना वाचवणे अशक्य वाटते. पण या सामन्यात हेच घडले. पहिल्या डावाच्या आधारे ४८ धावांची आघाडी घेतल्यानंतर ग्लॉसेस्टरने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा या डावातही गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ग्लुसेस्टरचा संघ यावेळी १०० धावाही पार करू शकला नाही आणि अवघ्या ८८ धावांत सर्वबाद झाला. आता नॉर्थम्प्टनशायरला विजयासाठी १३७ धावा करायच्या होत्या. या विकेटवर नॉर्थहॅम्प्टनशायरने जिंकण्याचा प्रयत्न केला नाही आणि गोलंदाजांना खूप मदत केली आणि अतिशय आरामात फलंदाजी करत तिसऱ्या दिवशी केवळ ४० धावा केल्या. तोपर्यंत नॉर्थम्प्टनशायरचे ७ विकेट पडल्या होत्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या ६ महिन्यांत मला झालेला त्रास कोणालाही माहिती नाही,’ हार्दिक पंड्याने व्यक्त केली हळहळ
‘…म्हणून टी२० विश्वचषकासाठी उमरानला संघात घेऊ नका’,रवी शास्त्रींच्या विधानाने माजली खळबळ
निवृत्तीच्या ३ वर्षांनंतर युवराज भावुक, इंस्टाग्राम वर शेअर केला व्हिडिओ






