क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत धावा करणं कोणत्याही फलंदाजासाठी सोपं नसतं. तिन्ही फॉरमॅटशी जुळवून घेणं आणि त्यात सातत्यानं धावा करणं ही मोठी कला आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांसारख्या क्रिकेटपटूंनी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत.
मात्र काही भारतीय क्रिकेटपटू असे आहेत जे केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावा करू शकले आणि कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरले. या क्रिकेटपटूंच्या नावावर एकदिवसीय आणि टी20 मध्ये अनेक मोठे विक्रम आहेत. त्यांनी भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटचा विचार केला तर या फॉरमॅटमध्ये त्यांचा विक्रम काही खास नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे जबरदस्त डावखुरा फलंदाज सुरेश रैना. सुरेश रैनानं भारतासाठी एकदिवसीय आणि टी-२० मध्ये जोरदार कामगिरी केली आहे. तो 2007 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. रैनानं 226 एकदिवसीय सामन्यात 35.31 च्या उत्कृष्ट सरासरीनं 5615 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे वनडेत 5 शतकं आहेत. मधल्या फळीत खेळताना त्यानं अनेक वेळा महत्त्वाच्या प्रसंगी संघाला विजय मिळवून दिलाय.
सुरेश रैनाला टी 20 क्रिकेटचा ‘पहिला सुपरस्टार’ म्हटलं जातं. भारतासाठी त्यानं 78 टी20 सामन्यांमध्ये 1604 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर एक टी-20 शतकही आहे. मात्र कसोटी क्रिकेटचा विचार केला तर रैनाची कामगिरी काही विशेष राहिली नाही. रैनानं भारतासाठी केवळ 18 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यानं 26.48 च्या सामान्य सरासरीनं केवळ 768 धावा केल्या. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 1 शतक झळकावलं आहे.
भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणारा युवराज सिंग त्याच्या काळातील सर्वोत्तम हिटरपैकी एक मानला जातो. 2007 चा टी 20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात युवराजचं योगदान खूप महत्वाचं होतं. 2000 मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या युवराजनं आपल्या कारकिर्दीत 304 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 111 विकेट्सही आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्यानं 1177 धावा आणि 28 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यानं 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रमही केला होता.
पण कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर युवराजला इथे काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं सुमारे 34 ची सरासरी आणि 3 शतकांच्या मदतीनं केवळ 1900 धावा केल्या. तर कसोटीत गोलंदाजी करताना त्यानं 9 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’
“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी