आयसीसी टी २० विश्वचषकात भारतीय संघाने जेतेपद जिंकले होते. टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या गौतम गंभीर आणि इरफान पठान यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. गंभीरने या सामन्यात ७५ धावांची अप्रतिम खेळी खेली केली होती. तसेच इरफान पठाननेही तीन विकेट्स घेऊन संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याला या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ निवडले गेले होते.
टी २० विश्वचषक २००७ मध्ये खेळलेल्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी चार खेळाडू सोडले तर बाकी सर्वांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. ज्या चार खेळाडूंनी निवृत्ती घेतलेली नाही, त्यांच्यातील केवळ एकाच खेळाडूला नियमित भारतीय संघात सामील केले जाते आणि तो आगामी टी २० विश्वचषकातही खेळणार आहे. बाकीचे तीन खेळाडू सध्या संघाच्या बाहेर आहेत. या लेखात आपण २००७ टी २० विश्वचषकामध्ये अंतिम सामन्यात खेळलेल्या भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
२००७ टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात खेळलेले भारतीय खेळाडू
गौतम गंभीर
गौतम गंभीरने टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ७५ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या दिल्लीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. बऱ्याच वेळा गंभीर समालोचन कक्षातही दिसतो. क्रिकेटच्या फिल्डवर असताना व आता फिल्डच्या बाहेर असतानाही तो सतत वादात असतो.
यूसुफ पठाण
यूसुफने पठाणने टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १५ धावा केल्या होत्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. युसूफ पठाण त्या विश्वचषकात एकच सामना खेळला होता. त्याने कोरोना काळात अनेकांना चांगली मदत केली. तसेच इरफानबरोबर तो अनेक क्रिकेट ॲकॅडमीही चालवतो.
राॅबिन उथप्पा
राॅबिनने या सामन्यामध्ये ८ धावा केल्या होत्या. त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही, पण तो राष्ट्रीय संघाच्या बाहेर आहे आणि सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने यावर्षी होत असलेल्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
युवराज सिंग
युवराजने या अंतिम सामन्यात १४ धावा केल्या होत्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. युवराजसाठी हा विश्वचषक खास ठरला होता. संपुर्ण भारतात तो त्यावेळी एक मोठा हिरो झाला होता. त्याने अमेरिकेत व इतर देशांच्या लीगमधे क्रिकेट खेळण्यासाठी निवृत्ती घेतल्याचे बोलले जात आहे. युवराज सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो अनेक खेळाडूंची फिरकी घेताना दिसतो.
महेंद्रसिंग धोनी
धोनीने या अंतिम सामन्यात ६ धावा केल्या होत्या. त्याने मागच्या वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, पण तो आयपीएमध्ये अजूनही खेळत आहे. २०२१ आयपीएलमधे त्याचा चेन्नई सुपर किंग्ज संघ चांगली कामगिरी करत आहे. तसेच २०२१ टी२० विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघाचे मेंटॉरही केले आहे. धोनी आयपीएल २०२१ नंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होईल, असे बोलले जात आहे.
रोहित शर्मा
रोहित शर्माने या अंतिम सामन्यात १६ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली होती. रोहित सध्या भारतीय संघाचा नियमित सदस्य आसून तो भारताच्या टी २० आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. २००७ पासून सर्वच टी२० विश्वचषकात खेळणारा रोहित एकमेव भारतीय खेळाडू आहे. रोहितकडे लवकरच भारतीय टी२० संघाचे कर्णधार येणार असल्याचे वृत्त आहे.
इरफान पठाण
इरफान पठाण या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याने आता आंतरराष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या समालोचन करतो.
आरपी सिंग
आरपी सिंगने अंतिम सामन्यात तीन घेतले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला असून नुकतेच त्याने भारतीय निवडकर्यांना ज्या समितीने निवडले, त्या समितीत तो होता.
हरभजन सिंग
हरभजन सिंगला अंतिम सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. तो आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळत आहे आणि समालोचनही करत आहे. त्याने अजून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. २००७ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या खेळाडूंपैकी तो, रोहित शर्मा, एस श्रीशांत व रॉबीन उथप्पा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. यातील केवळ रोहितच सध्याच्या भारतीय संघाचा सदस्य आहे.
जोगिंदर शर्मा
अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माने शेवटच्या विकेटसह एकूण दोन विकेट्स घेतल्या होत्या. तो सध्या हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी आहे. त्याने कोरोना काळात हरियाणा पोलीसमधे अतिशय चांगले काम केले व स्थलांतरित झालेल्या लोकांना चांगली मदत केली.
एस श्रीशांत
श्रीशांने अंतिम सामन्यात एक विकेट आणि मिस्बाहची झेल पकडली होती. मागच्या काही काळापासून त्याच्यावर क्रिकेटमध्ये बंदी घातली होती, पण आता ती बंदी उठवण्यात आली आहे. तो केरळकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून भारतीय संघात परतण्यासाठी उत्सुक आहे, परंतू बीसीसीआय त्याला संधी देईल की नाही हा मोठा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आज रंगणार आयपीएल उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’; युवा राजस्थानसमोर अनुभवी दिल्लीचे आव्हान
-सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद