आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २६ मार्चला आयपीएलच्या आगामी हंगामाचा पहिला सामना असणार आहे. यावर्षी आठ ऐवजी १० संघ आयपीएलच्या मैदानात आमने-सामने दिसतील. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ नव्याने सहभागी झाल्यामुळे लीग अधिकच रोमांचक बनली आहे.
आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. या स्पर्धेत भारतीय आणि विदेशातील दिग्गज सहभागी होत असतात. लीगमध्ये मिळणारा पैसा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खेळाडूंकडून केले जाणारे प्रदर्शन देखील चांगल्या दर्जाचे असते. आगामी हंगामात देखील आपल्याला अप्रतिम प्रदर्शन करणारे काही नवीन चेहरे मिळू शकतात. आपण आज या लेखात असा खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी सर्वाधिक वेळा आयपीएमध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेणार खेळाडू
अमित मिश्रा (Amit Mishra)
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिले नाव येते अमित मिश्राचे. अमित मिश्राने आयपीएलच्या इतिहातात एकूण ३ हॅट्रिक घेतल्या. त्याने दिल्ली डेअरडेविल्ससाठी खेळताना २००८ साली पहिली हॅट्रिक घेतली. हा सामना डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळला गेला होता. तसेच दुसरी हॅट्रिक डेक्कन चार्जर्सकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात घेतली, जो २०११ मध्ये खेळला गेला होता. मिश्राने त्याची तिसरी हॅट्रिक २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात घेतली. या सामन्यात तो सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता.
युवराज सिंह (Yuvraj Singh)
भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. युवराजने आयपीएलमध्ये दोन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने पहिली हॅट्रिक २००९ मध्ये घेतली. त्यावेळी युवराज किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळत होता आणि हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळला गेला होता. युवराजने त्याची दुसरी हॅट्रिक घेतली २००९ मध्येच. पंजाब किंग्जसाठी खेळताना डेक्कन चार्जर्सच्या सलग तीन खेळाडूंना युवराजने तंबूचा रस्ता दाखवला होता.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा एकमात्र फलंदाज आहे, ज्याने आयपीएमध्ये हॅट्रिक घेतली आहे. रोहितने ही कामगिरी २००९ साली केली होती, जेव्हा तो डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधित्व करत होता. मुंबई इंडियंविरुद्धच्या सामन्यात डेक्कन चार्जर्ससाठी रोहितने त्यावेळी सलग तीन विकेट्स घेतल्या आणि लीगमध्ये विकेट्सची हॅट्रिक करणारा पहिला फलंदाज बनला.
अजित चंदीला (Ajit Chandila)
अजित चंदीला देखील आयपीएमध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत एक हॅट्रिक घेतली, ही कामगिरी त्याने २०१२ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात केली होती. राजस्थानसाठी त्याने ही कामगिरी केली होती.
प्रवीण तांबे (Pravin Tambe)
आयपीएलमध्ये खेळताना हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पुढचे नाव येते प्रवीण तांबे याचे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या २०१४ मध्ये झालेल्या सामन्यात प्रवीण तांबेने ही कामगिरी केली होती. त्यावेळी तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत होता आणि कोलकाताच्या तीन खेळाडूंना त्याने लागोपाठ चेंडूवर तंबूत पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या –
महिला विश्वचषक: भारताला नमवत ऑस्ट्रेलियाचा सलग ५वा विजय, मिताली अन् कंपनीचा सेमीफायनचा मार्ग कठीण
IPL 2022 | मुंबई इंडियन्ससह ‘हे’ दोन संघ देऊ शकतात धोनीच्या सीएसकेला कडवी टक्कर
‘यश त्यांचे, अपयश माझे’, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा आयपीएलसाठी मंत्र