---Advertisement---

आयसीसीच्या फायनलमध्ये भारताचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते; पाहा यादी

On: शनिवार, मार्च 8, 2025 10:10 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आतापर्यंत सहा आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. या अंतिम सामन्यांमध्ये चमकदार खेळ करणाऱ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या बातमीद्वारे जाणून घेऊयात भारताच्या आयसीसीच्या अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार विजेते खेळाडू कोण कोण आहेत.

1983 आयसीसी वनडे विश्वचषक – मोहिंदर अमरनाथ
25 जून 1983 रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयात मोहिंदर अमरनाथने 80 चेंडूत 26 धावा केल्या आणि गोलंदाजीत 12 धावांत 3 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे त्यांना या अंतिम सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

2007 टी20 विश्वचषषक – इरफान पठाण
पहिल्याच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव केला. या सामन्यात इरफान पठाणने 16 धावांत 3 बळी घेत पाकिस्तानला 152 धावांवर रोखले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला.

2011- वनडे विश्वचषक – एम एस धोनी
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. ज्यात कर्णधार एम.एस. धोनीने नाबाद 91 धावा करत ऐतिहासिक षटकार मारून सामना संपवला. ज्यामुळे त्याला सामनावीर देण्यात आला.

2013 – चॅम्पियन्स ट्राॅफी – रवींद्र जडेजा
इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने पाच धावांनी विजय मिळवला. जडेजाने नाबाद 33 धावा आणि 2 बळी घेत अष्टपैलू खेळ दाखवत भारताला अपराजित चॅम्पियन बनवले. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

2024 – टी20 विश्वचषक – विराट कोहली
बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. ज्यात विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने केलेल्या खेळीमुळे तो सामनावीर पुरस्कार मिळवला.

भारतीय संघाने वेळोवेळी मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत क्रिकेटप्रेमींच्या आठवणींमध्ये कायमचे स्थान मिळवले आहे.

हेही वाचा-

IND vs NZ: फायनलमध्ये कोण मारणार बाजी? माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी
IND vs NZ: फायनलनंतर रोहित-विराट होणार निवृत्त? उपकर्णधाराचा मोठा खुलासा
IND vs NZ Final: “नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार..” विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---