---Advertisement---

अर्धशतक न करताही सॅमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद, बनला फक्त दुसरा भारतीय पठ्ठ्या

Sanju-Samson
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (दि. २४ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानात खेळला गेलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाद खुळा विक्रम केला. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात तो अशी कामगिरी करणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी राजस्थानकडून यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर सलामीवीर जयसवाल बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने मैदानावर पाऊल टाकले. त्याने येताक्षणीच गुजरातच्या गोलंदाजांना चोप द्यायला सुरुवात केली.

सॅमसनने यावेळी फलंदाजी करताना अवघ्या २६ चेंडूत ४७ धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ५ चौकारांचीही बरसात केली. यावेळी त्याला अर्धशतक करता आले नाही. मात्र, त्याने या धावांसह एक खास कारनामा आपल्या नावावर केला. तो आयपीएल २०२२मध्ये १५०हून अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळताना ४०० हून अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी राहुल त्रिपाठी यानेही असा कारनामा केला आहे.

त्रिपाठीने १४ सामन्यात फलंदाजी करताना ३७.५५च्या सरासरीने आणि १५८.२३च्या स्ट्राईक स्ट्राईक रेटने खेळताना ४१३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत.

सामन्याचा आढावा
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. यामध्ये जोस बटलर याने सर्वाधिक ८९ धावा चोपल्या. तसेच, कर्णधार संजू सॅमसनने ४७ धावा आणि देवदत्त पडिक्कलने २८ धावा केल्या. यावेळी गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल, साई किशोर आणि कर्णधार हार्दिक पंड्या याने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

आयपीएलमध्ये १५०हून अधिक स्ट्राईक रेटने ४००हून अधिक धावा करणारे खेळाडू
राहुल त्रिपाठी- ४१३ धावा (१५८.२३ स्ट्राईक रेट)
संजू सॅमसन- ४२१ धावा (१५०.३५ स्ट्राईक रेट)*

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्वालिफायर सामन्याच्या आधीच साहाने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी महत्वाची अपडेट, वाचा काय म्हणाला

क्या बात है! सर्फराज खानच्या भावाची मुंबईच्या रणजी संघात एंट्री, जबरदस्त फटकेबाजी करण्यात चांगलाच माहीर

टीममेटनेच हरमनप्रीतला दिला दगा अन् झाली रनआऊट, मैदान सोडताना अशी काढली भडास – Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---