---Advertisement---

क्वालिफायर सामन्याच्या आधीच साहाने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी महत्वाची अपडेट, वाचा काय म्हणाला

On: मंगळवार, मे 24, 2022 7:16 PM
Wriddhiman-Saha
---Advertisement---

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर मंगळवारी (२४ मे) आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असेलेल्या गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहाच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. आरसीबीविरुद्ध शेवटचा सामना खेळताना त्याला दुखापत झाल्याचे समोर आले होते.

आरसीबीविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याचे हॅमस्ट्रिंग ताणले गेल्याचे समोर आले होते. आता गुजरात आणि राजस्थान यांच्यातील क्वालिफायर सामन्याच्या आधी घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत साहाने स्वतः त्याच्या फिटनेसविषयी माहिती दिली. त्याने सांगितल्यानुसार तो आता पूर्णपणे फिट आहे आणि राजस्थन रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात निवड केली जाण्यासाठी उपलब्ध देखील आहे.

राजस्थानविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात साहाने त्याची रणनीती काय असेल, याचा खुलासा केला. त्याने सांगितल्याप्रमाणे, प्रयत्न हाच  असेल की, सुरुवातीला वेगात धावा केल्या जाव्या. मला पॉवरप्लेमध्ये जोखमीचे शॉट्स खेळायला आवडते. जर मी सुरुवातीच्या षटकांमध्ये भागीदारी केली, तर बाकीच्या फलंदाजांचे काम सोपे होते. साहा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचा महत्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याचे होम ग्राउंड ईडन गार्डन्समध्ये त्याचे तीन वर्षांनी पुनरागमन होत आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, आपल्या लोकांमध्ये खेळल्यामुळे नेहमीच वेगळा अनुभव मिळत असतो.

साहाचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने ९ डावांमध्ये १२५च्या स्ट्राईक रेटसह ३१२ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि यामध्ये संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला गुजरात संघात सलामीवीर जोडीची समस्या होती, पण साहाचे कॅम्पमध्ये आगमन झाल्यापासून त्यांची सलामीवीर जोडी चांगली कामगिरी करत आहे. साहाच्या आधी शुबमन गिलसोबत मॅथ्यू वेडने डावाची सुरुवात केली होती, पण ते संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नव्हते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरूनही वेंकटेश अय्यरला टीम इंडियात मिळाली संधी, काढणार का दक्षिण आफ्रिकेचा घाम?

‘देशातील ऑलिम्पिक चळवळ अधिक भक्कम होण्याबाबत मी आशादायी’, नीता अंबानीचे मोठे वक्तव्य

आशिष नेहराने मारली चहलच्या कंबरेत लाथ, गुजरातने शेअर केलेल्या फोटोची रंगलीय चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---