आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार ऑयन मॉर्गन हा आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचा एक महत्वाचा खेळाडू आहे. मॉर्गनचा असा विश्वास आहे की जर एखादा संघ खूप मेहनत करून प्रगती करत असेल तर कर्णधारपद न मिळवताही खेळाडू महत्वाची भूमिका बजावतात. त्याला असे वाटते की आयपीएलच्या पहिल्या तीन आठवड्यांत संघ व्यवस्थापकाने चांगले काम केले आहे.
ऑयन मॉर्गनने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आमच्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत पण त्यांच्याकडे अनुभव नाही. कर्णधार, प्रशिक्षक आणि उप-कर्णधाराव्यतिरिक्त इतर वरिष्ठ खेळाडू संघात खेळाडूंची निवड करतात ही या संघात एक महत्वपूर्ण बाब आहे.”
जेव्हा त्याला विचारले गेले की यशस्वी आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून तो केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकला स्वइच्छेने सूचना देतो किंवा त्याने मागितलेल्या मदतीची वाट पाहतो का? या प्रश्नावर तो म्हणाला, “मला वाटते की संघात उत्तम वातावरण आहे. माझा विश्वास आहे की कर्णधार दिनेश कार्तिक आणि प्रशिक्षक ब्रेंडन म्यॅक्यूलम संघाची अतिशय उत्तमपणे काळजी घेत आहेत.”
आयर्लंडच्या मॉर्गनने प्रतिष्ठित कर्णधार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.तो एका अशा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार आहे ज्यामध्ये खेळाडू आणि त्यांच्या संस्कृतीत बरीच विविधता आहे. त्याला आनंद आहे की कोलकाता संघातही वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या भाषांमधील खेळाडू आहेत.
याबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला, “मला वाटते की खेळ नेहमीच पूर्णपणे भिन्न असतो परंतु जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपण आपल्या मातृभाषेतच बोलण्याचा प्रयत्न करतो खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये क्रिकेटविषयी बोलतात हे पाहून चांगले वाटते आणि ज्या खेळाडूंना त्या भाषेबद्दल माहिती नाही त्यांनादेखील थोडंफार संभाषण कळते.”
महत्त्वाच्या बातम्या-
-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन
-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी
-…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली
ट्रेंडिंग लेख-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ