मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने रॉयल चॅलेंजर बेंगलोर अर्थात आरसीबीच्या युझवेन्द्र चहलला संघात कायम न ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. जर त्यांनी २७-२८ जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावात त्याला कायम केले नाही तर ते मूर्खपणाचे ठरेल असे म्हटले आहे.
रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने या मोसमात विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स आणि सर्फराझ खान या खेळाडूंना संघात कायम केले. त्याचवेळी भारतीय संघाकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युझवेन्द्र चहलला मात्र संघाने कायम केले नाही.
भारताकडून २०१७मध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे.
“मला माहित नाही की युझवेन्द्र चहलला किती किंमत मिळेल. परंतु त्याला जर रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने कायम केले नाही तर हे नक्कीच मूर्खपणाचे ठरेल. ” असे सेहवाग स्पोर्टसकिडाशी बोलताना म्हणाला.