भारतीय क्रिकेट संघ 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2022 साठी तयारीला लागला आहे. 12 सप्टेंबरला बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणाही केली आहे. या संघात सलामी जोडी म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांची जागा जवळपास निश्चित आहे. तर या दोघांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील विराट कोहली, सूर्यकुमार यादव किंवा रिषभ पंत यांपैकी एकाला सलामीचा पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. हे तिघेही टी20 विश्वचषकासाठीच्या संघाचा भाग आहेत.
यानंतर 2 भारतीय सलामीवीरांची टी20 कारकिर्द (T20 World Cup 2022) जवळपास संपुष्टात आली असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या सलामीवीरांवर संघ निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे. याच दोन खेळाडूंबद्दल जाणून घेऊ…
शिखर धवन-
धवन (Shikhar Dhawan) गेल्या वर्षभरापासून भारताच्या टी20 संघातून बाहेर आहे. आपल्या विस्फोटक फलंदाजीनंतरही तो टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. जुलै 2021 मध्ये त्याने शेवटचा टी20 सामना खेळला होता. धवनला मागील टी20 विश्वचषक 2021 साठीही निवडले गेले नव्हते. यानंतर वनडे क्रिकेटमध्ये दम दाखवल्यानंतरही धवनवर संघ निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. टी20 विश्वचषकासाठी धवनला तिसऱ्या सलामीवीराच्या रूपात निवडले जाऊ शकले असते. परंतु त्याच्यावर पुन्हा एकदा कानाडोळा करण्यात आला आहे.
याबरोबरच अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली हा देखील धवनच्या पुनरागमनात अडथळा ठरू शकतो. कारण विराटने टी20त सलामीला फलंदाजी करताना स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने नुकतेच आशिया चषकात सलामीला फलंदाजी करताना शतक ठोकले होते.
पृथ्वी शॉ-
युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला त्याच्या खराब प्रदर्शनामुळे टी20 संघातून बाहेर करण्यात आले होते. जुलै 2021 पासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी20 स्वरूपात आणि आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यानंतरही शॉसाठी भारताच्या टी20 संघाची दारे उघडली नाहीत. एकवेळी विरेंद्र सेहवागसोबत तुलना केली जात असलेल्या शॉची जागा ईशान किशन, ऋतुराज गायकवाड यांनी घेतली आहे. त्यानंतर आता टी20 विश्वचषक 2022 साठीही त्याला ग्राह्य धरले गेले नाही. यावरून शॉचे भारताच्या टी20 संघात पुनरागमन करणे महाकठीण बनले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अबब! रोहितच्या अंडर विश्वचषकात खेळणार 5 कॅप्टन, विराटसह पाहा कोण आहेत ‘ते’ चार
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”
क्रिकेट कारकिर्दीत 5 शतके ठोकणाऱ्या ‘या’ भारतीय यष्टीरक्षकाचे निधन